Bharti Hexacom IPO


Telegram Group Join Now

Bharti Hexacom IPO

IN THIS ARTICLE WE WILL SEE THE UPCOMING IPO OF ONE OF THE TELECOM COMPANY.

Bharti Hexacom IPO: Bharti Hexacom Limited is the wholly owned subsidiary company of Bharti Airtel Limited having a stake of 70% in it and the Government of India through Telecommunication Consultants of India Limited holds 30% of the equity share capital of the Company. Currently, these shares are trading at 1127 rupees.
Bharti Airtel’s board of directors has decided to go for IPO, The company disclosed this in a recent regulatory filing.
BHARTI Hexacom has filled the draft document with Sebi as per regulatory requirements.

Upcoming Bharti Hexacom IPO Date

भारती एअरटेलच्या (Bharti Airtel) बोर्डाने त्यांची उपकंपनी भारती हेक्साकॉमच्या (Bharti Hexacom) आयपीओला मान्यता दिली आहे. कंपनीने नुकतीच नियामक फायलिंगमध्ये ही माहिती दिली. भारती हेक्साकॉमने बाजार नियामक सेबीकडे आयपीओसाठी मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत.

भारती हेक्साकॉमच्या आयपीओअंतर्गत, 5 रुपये फेस वॅल्यूचे 10 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. एक्सचेंज फायलिंगनुसार, हे कंपनीच्या पेड-अप शेअर कॅपिटलच्या 20 टक्के आहे. ऑफरमध्ये नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनी ने 19 जानेवारीला टेलिकॉम कन्सल्टंट इंडिया लिमिटेडच्या प्रस्तावित आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे डीआरएचपी दाखल केल्याचे नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे. कंपनीने पुढे सांगितले की हा आयपीओ पूर्णपणे ओएफएस आहे, त्यामुळे भारती हेक्साकॉमला आयपीओमधून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही.

आयपीओअंतर्गत, भारत सरकार ओएफएसद्वारे भारती हेक्साकॉममधील 20% स्टेक विकणार आहे. ओएफएस अंतर्गत विकले जाणारे 10 कोटी शेअर्स सध्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी टेलिकॉम कंसल्टंट इंडिया लिमिटेडकडे आहेत. भारती ग्रुपचा शेवटचा आयपीओ भारती इन्फ्राटेलचा होता, जो आता इंडस टॉवर्स म्हणून ओळखला जातो. ही कंपनी 2012 मध्ये लिस्ट झाली होती.

Note – Investing in crypto market, stock market or mutual fund involves risk. It has the possibility of harm as well as benefit. So before making any investment in crypto, stock market or mutual fund, consult your financial advisor.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. […] Bharti Hexacom IPO Date – भारती एअरटेलची (Bharti Airtel) उपकंपनी भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) लवकरच आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. बाजार नियामक सेबीने आयपीओ लाँच करण्यास त्यांना मान्यता दिली आहे. हेक्साकॉमच्या आयपीओमध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत आणि ते पूर्णपणे ऑफर-फॉर-सेलवर (OFS) आधारित असेल. ऑफर-फॉर-सेलद्वारे (OFS), कंपनीचा एकमेव सार्वजनिक भागधारक, टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड, त्याच्या 10 कोटी शेअर्सची विक्री करेल. याचा अर्थ असा आहे की आयपीओमधून मिळालेली संपूर्ण रक्कम कंपनीकडे जाणार नाही तर टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेडकडे जाईल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत 64.6 टक्क्यांनी घसरून 69.1 कोटीवर आला आहे. याच कालावधीत महसूल 8 टक्क्यांनी वाढून 3,420.2 कोटीवर पोहोचला आहे. […]

Leave A Reply

Your email address will not be published.