‘फेरफार’ च्या नोंदी आता होणार ऑनलाईन | Bhumi Abhilekh Ferfar Nondani Will be Online
Bhumi Abhilekh Ferfar Nondani Will be Online
Bhumi Abhilekh Ferfar Nondani Will be Online: सातबारा उतार्यामधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या १५५ कलमावावत तहसीलदारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता यापुढे १५५ कलमाचे आदेश ऑनलाइनच करावे लागणार आहेत. ऑफलाइन फेरफार करता येणार नाहीत, असे आदेश भूमिअभिलेख विभागाने दिले आहेत. त्यामुळे या कलमाच्या नावाखाली करण्यात येणारे ‘महसूल’मधील गोरखधंदे कायमचे बंद होणार आहेत.
आदेश फेरफारांची नोंद कशी व कुणी केली, याची ऑनलाइन पडताळणीही होणार असल्याने तलाठ्यांपासून तहसीलदारांपर्यंत सर्वांनाच डोळ्यात तेल घालून फेरफार नोंदी विहित मुदतीत कराव्या लागणार आहेत. भूमिअभिलेख विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे. यापूर्वीच्या तरतुदीनुसार केवळ हस्ताक्षर किंवा हस्तलिखितातील चुका महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ च्या १५५ या कलमाद्वारे दुरुस्त करता येत होत्या. हे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. मात्र, सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण झाल्यानंतर तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पातळीवर हस्तलिखित उताऱ्यातील नावे व क्षेत्र चुकविणे, नवीन शर्तीचे शेरे, कूळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, आकारीपडबाबतचे शेरे, वारसांच्या नोंदी वैध व कायदशीर नोंदी यामध्ये गैरप्रकार झाले. अनेक ठिकाणी गायरानाच्या जमिनीवर व्यक्तांची नावे लावण्यात आली.
काही ठिकाणी एका मालकाच्या नावाऐवजी दुसऱ्याचे नाव लावण्यात आले. यासाठी फेरफार करताना अनेकदा ऑफलाइन नोंदविण्यात आले, त्यामुळे हे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारला स्वतंत्र मोहिमही आखावी लागली.
नियंत्रण येणार—–
यावर नियंत्रण आणण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने आता कलम १५५ नुसार काय करावे किंवा काय करू नये, यासाठी स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आता या कलमाचा वापर केल्यावर दिलेले आदेश ऑनलाइनच देण्यात येणार आहेत
कलम १५५ च्या नोंदी आता ऑनलाईनच कराव्या लागणार आहेत. त्याची पडताळणी केली जाईल. कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येईल. – डॉ. सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त तथा भूमिअभिलेख संचालक, पुणे