चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? बँकेच्या परीक्षेत ‘हायटेक कॉपी’! Chandrapur DCC Bank Exam Issue
Chandrapur DCC Bank Exam Problem
Chandrapur DCC Bank Exam Issue: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर रविवारी (ता. २२) गोंधळ उडाला. ब्लू टूथ एअरवइसद्वारे कॉपी करणाऱ्या कॉपीवहाहराला शेजारील परीक्षार्थीनी पकडून दिले. तपासणीदरम्यान त्याच्याकडून एअरवड्स, सूजमध्ये मोबाइल आढळून आला. गॉधळ झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत परीक्षार्थी पेपर सोडून पसार झाला होता. याप्रकरणी तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया छावणी पोलिस ठाण्यात करण्यात येणार असल्याचे समजते.
सहकारी बँकेच्या २६१ लिपिक व ९७ शिपाई, अशा ३५८ पदांच्या भरतीसाठी ३१ हजार १५६ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६१ लिपिक व ९७ शिपाई, अशा ३५८ पदांच्या भरतीसाठी ३१ हजार १५६ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. ही परीक्षा राज्यातील नऊ जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सुरवातीपासून वादांमुळे चर्चेत आहे. शनिवारी ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची घटना समोर आली होती. त्यातच दुसऱ्या दिवशीही गोंधळ समोर आला. मुंबईच्या खासगी आयटी कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी आहे. रविवारी लिपिक पदासाठीची परीक्षा झाली. दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षार्थींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सत्रात पेपर संपण्याच्या काही मिनिटे आधी एक जण सारखा कानाला हात लावत असल्याचा संशय निर्माण झाला. हा प्रकार त्याने पर्यवेक्षकांना सांगितला.
संशयिताची ‘तपासणी का केली नाही ?’
•या संपूर्ण प्रकरणावर वर्गातील एका परीक्षार्थनि आरोप केला, की ऑनलाइन परीक्षा घेतली गेली. तर परीक्षा कक्षात सोडताना तपासणी का करण्यात आली नाही ?’ दुसरीकडे, केंद्रावरील उपस्थित कर्मचाऱ्याने सांगितले, की ‘बाप्रकरणी पोलिसांनी संबंधितांना तक्रार देण्यास सांगण्यात आले असून संबंधित परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडून तक्रार दाखल करण्यात येईल.