Changes in Vehicle Registration and DL Certificate Format – ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्रांचे स्वरूप बदलणार
Changes in RC and DL Certificate Format
Changes in RC and DL Certificate Format
Changes in RC and DL Certificate Format: राज्यातील वाहनचालकांना देण्यात येणारा ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) चे स्वरूप बदलले जात आहे. राज्य परिवहन विभाग मायक्रोचिप आणि क्यूआर कोडने सुसज्ज डीएल आणि आरसी शॉर्ट कार्ड वित्तरित करण्याची तयारी करत आहे. डीएल आणि आरसीचे स्वरूप संपूर्ण देशात सारखेच असावे, यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य परिवहन विभाग तयारी करत आहे.
एमओआरटीएचने मार्गदर्शक सूचनांनुसार, दिलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्राची छपाई आणि वितरण करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. नवीन लायसन्स आणि आरसी सप्टेंबरपासून वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन डीएलमध्ये ड्रायव्हरचे नाव, जन्मतारीख पत्ता, रक्तगटाचा तपशील, डीएलधारवः अवयव दाता आहे की नाही, हे देखील नमूद असेल. तसेच मोबाईल नंबर, त्याचे नातेवाईक किंवा तत्काळ मोबाईल कॉल नंबर देखील नमूद केले जातील