Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Crizac IPO – क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा IPO जाहीर!

Crizac IPO 2025


Telegram Group Join Now

स्टुडंट रिक्रूटमेंट सोल्युशन प्रदाता प्रोव्हायडर क्रिझॅक (Crizac) Crizac IPO 2025 लवकरच त्यांचा आयपीओ लॉन्च करणार आहे. यासाठी, कंपनीने सोमवारी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस पुन्हा दाखल केला आहे. पब्लिक इश्यूद्वारे 1000 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. या आयपीओमध्ये फ्रेश शेअर्स जारी केले जाणार नाहीत आणि प्रमोटर्सकडून फक्त ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) शेअर्स विकले जातील. याचा अर्थ आयपीओमधून मिळणारी संपूर्ण रक्कम विक्री करणाऱ्या शेअरहोल्डर्सकडे जाईल. ओएफएसचा भाग म्हणून पिंकी अग्रवाल 841 कोटीचे शेअर्स आणि मनीष अग्रवाल 159 कोटीचे शेअर्स विकतील. यापूर्वी कंपनीने मार्च 2024 मध्ये मसुदा कागदपत्रे दाखल केली होती. पण, सेबीने जुलैमध्ये कंपनीला आयपीओची कागदपत्रे परत केली आहेत. हे युनायटेड किंगडम, कॅनडा, रिपब्लिक ऑफ आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील हायर एजुकेशनच्या ग्लोबल इंस्टीट्यूशनला इंटरनॅशनल स्टुडंट रिक्रूटमेंट सॉल्यूशन प्रोवाइड करते.

Crizac IPO 2025

आर्थिक वर्ष 2022 ते सप्टेंबर 2024 पर्यंत, उच्च शिक्षणाच्या 135 पेक्षा जास्त जागतिक संस्थांसोबत काम करताना 5.95 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन्स प्रोसेस केले. कंपनीचे जागतिक स्तरावर सुमारे 7,900 एजंट आहेत जे त्यांच्या टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्मवर रजिस्टर्ड आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये महसूल 274 कोटींवरून 93.4 टक्क्यांनी वाढून 530 कोटी झाला. कंपनीचा एबिटदा 37.2 टक्क्यांनी वाढून 143.8 कोटी झाला, पण मार्जिन मागील वर्षाच्या तुलनेत 1,110 बीपीएसने घसरून 27.1 टक्क्यांवर आला.

नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.