डिफेन्स सेक्टरमधील ‘या’ स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तूफान तेजी! – Defence sector small cap funds shares
Defence sector small cap funds shares
स्मॉलकॅप कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये गुरुवारी चांगली वाढ झाली. त्यामुळे सध्या या शेअर्सची किंमत 1294.55 रुपयांवर पोहोचली. सरकारकडून डिफेन्स प्रॉडक्ट्स तयार करण्याचा परवाना मिळाल्यानंतर या शेअर्समध्ये वेगाने वाढ झाली आहे. कंपनीला इंडस्ट्रियल लायसन्सिंग सेक्शन, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड, जे कॉमर्स अँड इंडस्ट्री मंत्रालया अंतर्गत येते. त्यांच्याकडून डिफेंस प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी इंडस्ट्रियल लायसन्स मिळाले आहे.
या लायसन्सअंतर्गत कंपनी अनेक प्रकारचे डिफेंस प्रॉडक्ट तयार करु शकणार आहे. यामध्ये इन्फ्रारेड किंवा थर्मल इमेजिंग इक्विपमेंट्स, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम, रडार सिस्टमसाठी सब सिस्टम्स आणि प्लॅटफॉर्म, मॉड्यूल आणि कंट्रोल असेंब्लीसह इतर विविध प्रॉडक्ट्सचा समावेश आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजला मिळालेल्या या लायसन्सची वैधता सुमारे 15 वर्षांची आहे. कंपनीने एक्सचेंजला असेही सांगितले की डिफेंस प्रॉडक्ट्सच्या निर्मितीसाठी इंडस्ट्रियल अंडरटेकिंग नवी मुंबई, महाराष्ट्र इथे असेल.
पारस डिफेन्स आयडीएफ, डीआरडीओ, बीईएल, इसरो, एचएएल, गोवा शिपयार्ड आणि माझगाव डॉकरख्या विविध सरकारी संस्थांना डिफेंस प्रॉडक्ट्स सप्लाय करते. कंपनीच्या खासगी क्लायंटबद्दल बोलायचे झाले तर त्यात गोदरेज, टाटा पॉवर, एल अँड टी, किर्लोस्कर, टीसीएस आणि सोलर इंडस्ट्रीज सारख्या सुप्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे.