दूध यंत्र, मुक्त गोठ्यासाठी अनुदान, दूध यंत्र, मुक्त गोठ्यासाठी अनुदान – dudh anudan yojana maharashtra online apply
dudh anudan yojana Maharashtra
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे सेस अनुदानातून राबविण्यात येणाऱ्या दूध काढणी यंत्र आणि मुक्तसंचार गोठा योजनेसाठी जिल्ह्यातील २०८ शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यात सर्वाधिक शेतकरी हे संगमनेर व नेवासा तालुक्यांतील आहेत. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनांसाठी पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सभेत ही लॉटरी काढण्यात आली. यात दूध काढणी यंत्रासाठी जिल्ह्यातून ३ हजार ३१३ अर्ज प्राप्त झाले होते. या योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून २० लाख रुपयांची तरतूद केलेली होती. योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दूध काढणी यंत्र खरेदीसाठी यंत्राच्या एकूण किमतीच्या ६० टक्के किंवा जास्तीत जास्त १५ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत जिल्हाभरातील १३३ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
मुक्तसंचार गोठ्यासाठी १५ लाख रुपयांची तरतूद पशुसंवर्धन विभागाने केली होती. या योजनेसाठी ३ हजार ४६४ अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरी पद्धतीने यातून ७५ लाभार्थी निवडण्यात आले.
Mukht gotha anudan