E-Peek Pahani Online – ई-पीक पाहणी कशी करावी ?
E-Peek Pahani Online
E-Peek Pahani Online
The e-crop inspection done by the farmers will be considered as self-certified as the farmers themselves register their crop sowing. If there is a wrong entry while recording the crop, the farmers themselves can correct it within 48 hours. The crop inspection proceedings for summer season 2023-24 have been started from 15th April
E-Peek Pahani Online: शेतकऱ्यांनी स्वतः आपला पीक पेरा नोंदविल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येणार आहे. पिकाची नोंद घेत असताना चुकीची नोंद असल्यास स्वतः शेतकऱ्यांना 48 तासांत दुरुस्ती करता येईल. उन्हाळी हंगाम 2023-24 पीक पाहणी कार्यवाही 15 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
e-Pik Pahani
तसेच ई-पीक पाहणी हे मोबाइल अॅप गुगल प्लेस्टोअरवर 15 एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपण यापूर्वी सदर अॅप मोबाइलवर इंस्टॉल केले असल्यास त्याला अपडेट करावे किंवा अनइंस्टॉल करून परत गुगल प्लेस्टोअरवर सर्च करून इंस्टॉल करावे. ई-पीक पाहणी हे मोबाइल अॅप आपल्या मोबाइलमध्ये नसल्यास गुगल प्लेस्टोअरवर सर्च करून इंस्टॉल करावे व उन्हाळी हंगामातील पीक पाहणी येत्या 30 एप्रिलपर्यंत विहित वेळेत पूर्ण करावे, तसेच पिक पाहणी करताना अडचणी आल्यास (02025711712) या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावे, असे उपजिल्हाधिकारी महसूल शारदा जाधव यांनी कळविले आहे
Nodni