Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांसाठी आर्थिक प्रोत्साहन योजना | ELI Yojana Application 2025


Telegram Group Join Now

ELI Yojana Application 2025: भारतीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये जाहीर झालेली ईएलआय योजना 2025 (रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजना) ही एक महत्त्वाची सरकारी पुढाकार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशात औपचारिक रोजगार निर्मितीला चालना देणे हा आहे. ही योजना विशेषतः अशा कर्मचाऱ्यांना आणि नियोक्त्यांना केंद्रस्थानी ठेवून राबवली जाणार आहे जे ईपीएफओ (EPFO) मध्ये नोंदणीकृत आहेत आणि पहिल्यांदाच औपचारिक नोकरी करत आहेत.

✅ महत्त्वाच्या तिथी

  • योजनेची घोषणा : अर्थसंकल्प 2024-25
  • लाभ लागू कालावधी : 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027
  • ईपीएफओ नोंदणी व आधार सीडिंगची अंतिम तारीख : 30 जून 2025
  • नोंदणी कालावधी : 2 वर्षे

🎯 पात्रता अटी

  • उमेदवाराची मासिक वेतनमर्यादा ₹1 लाखांपेक्षा कमी असावी
  • EPFO मध्ये नोंदणी आवश्यक
  • UAN सक्रिय असावा व आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे
  • नियोक्त्याने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक नवीन रोजगार निर्माण केलेले असावे
  • उत्पादन क्षेत्रातील प्रोत्साहनासाठी किमान 50 गैर-EPFO कामगारांची भरती आवश्यक

🔁 ईएलआय योजनेअंतर्गत तीन उपयोजना

🅰️ योजना A – पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांसाठी

लाभ: ₹15,000 पर्यंत थेट बँक खात्यात दोन हप्त्यांमध्ये

  • पहिला हप्ता – 6 महिन्यांचे सलग EPFO सदस्यत्व
  • दुसरा हप्ता – 12 महिने पूर्ण + वित्तीय साक्षरता अभ्यासक्रम
  • कालावधी: EPFO सदस्यत्वानंतर 2 वर्षे
  • विशेष अट: 12 महिन्यांपूर्वी नोकरी सोडल्यास नियोक्त्याने सबसिडी परत करावी लागेल
  • लाभार्थी संख्या (अनुमानित): 210 लाख युवक

🅱️ योजना B – उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती

लक्ष्य: उत्पादन क्षेत्रातील नियोक्ते व पहिल्यांदा नोकरी करणारे

पात्र नियोक्ते:

किमान 3 वर्षांचा EPFO ट्रॅक रेकॉर

  • ≥50 गैर-EPFO कामगार किंवा 25% बेसलाइनपेक्षा अधिक
  • फक्त In-sourced कर्मचारी लागू
  • वेतन मर्यादा: ₹1 लाख (परंतु सबसिडी ₹25,000 पर्यंतच्या वेतनासाठीच)

योजना C – नियोक्त्यांना सहाय्य

या योजनेचे तपशील अधिकृत अधिसूचना नंतर उपलब्ध होतील, मात्र उद्देश आहे – नियोक्त्यांना आर्थिक सहाय्य देऊन रोजगार निर्मितीला गती देणे.

अर्ज कसा करावा?

EPFO अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी

आधार, बँक खाते, UAN लिंक करणे आवश्यक

अर्ज प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती साठी epfindia.gov.in ला भेट द्या

ELI  Scheme  2025 चे फायदे:

  1. बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळणार.
  2. कंपन्यांना नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यास प्रोत्साहन मिळणार.
  3. उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती होणार.
  4. रोजगार निर्मितीत मोठी वाढ होणार.
  5. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

आवश्यक कागदपत्रांची यादी

नोकरीचं ऑफर लेटर (कंपनीने दिलेलं)

आधार कार्ड

PAN कार्ड

शैक्षणिक प्रमाणपत्रे

पासपोर्ट साईझ फोटो

बँक खाते तपशील



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.