महिलांसाठी खास रोजगाराची संधी!-Exclusive Job Fair for Women!
Exclusive Job Fair for Women

पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत येत्या सोमवारी, सकाळी १० वाजता, रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्स्पोर्ट कंपनीत महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. Exclusive Job Fair for Women
दहावी पास / नापास आणि बारावी पास अशा २०० पेक्षा जास्त महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने घेतला जात आहे.
नोंदणी कशी करायची?
सर्व इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन आधी नोंदणी करावी. ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांनी आपलं प्रोफाइल अपडेट करावं.
नोंदणीनंतर, युझर आयडी आणि पासवर्ड वापरून मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा.
प्रत्यक्ष गद्रे मरीन एक्स्पोर्टच्या ठिकाणी मुलाखतीसाठी बायोडाटा आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती घेऊन हजर राहावं.
नोंदणी नसलेल्यांनी त्वरित कार्यालयाशी संपर्क करून नाव नोंदवावं, आणि रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केलं आहे.