Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


1 ऑगस्टपासून फास्टॅगशी संबंधित नवे नियम लागू होणार, काय आहे नवीन बदल जाणून घ्या!

FastTag New Rules 2024


Telegram Group Join Now

प्रत्येक महिन्याला नवनवीन बदल होतात आणि आगामी ऑगस्ट महिनाही याला अपवाद नाही. १ ऑगस्टपासून फास्टॅगशी संबंधित सेवांवर नवीन नियम लागू होणार आहेत. अशा स्थितीत, वाहनचालकांना सतर्क राहून येत्या काही दिवसांत होणाऱ्या बदलांची माहिती असली पाहिजे अन्यथा त्यांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे तुमच्याकडेही वाहन असेल तर होणाऱ्या बदलांविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.  तसेच या संदर्भातील नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल किंवा  टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

FastTag New Rules 2024

फास्टॅगचे नियम बदलणार
पुढील महिन्यात होणाऱ्या नियमानुसार वाहन घेतल्यानंतर ९० दिवस म्हणजे तीन महिन्यांच्या आत फास्टॅग क्रमांकावर वाहन नोंदणी क्रमांक अपलोड करावा लागेल. असे न केल्यास नंबर हॉटलिस्टमध्ये टाकला जाईल ज्यानंतर ३० दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल, मात्र त्यातही वाहन क्रमांक अपडेट न केल्यास फास्टॅगला काळ्या यादीत टाकले जाईल. दरम्यान, दिलासा देणारी बाब म्हणजे की फास्टॅग सेवा पुरवठादार कंपन्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पाच आणि तीन वर्षे जुन्या सर्व फास्टॅगचे केवायसी करावे लागेल.

फास्टॅगचे कोण-कोणते नियम बदलणार

  • पाच वर्षे जुना फास्टॅग कंपन्यांना प्राधान्याने बदलावा लागेल
  • तीन वर्षे जुन्या फास्टॅगचे KYC पुन्हा करावे लागेल
  • वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक फास्टॅगशी लिंक केलेला असावा
  • नवीन वाहनाचा नंबर ९० दिवसांच्या आता अपडेट करावा
  • फास्टॅग सेवा पुरवठादार कंपन्यांनी वाहनांचा डेटाबेस सत्यापित करावा
  • केवायसी करताना वाहनाच्या समोर आणि बाजूचे स्पष्ट फोटो अपलोड करावा लागणार
  • फास्टॅग मोबाईल नंबरशी लिंक करणे अनिवार्य असेल
  • केवायसी पडताळणी प्रक्रियेसाठी ॲप, व्हॉट्सॲप आणि पोर्टलसारख्या सेवा उपलब्ध करून द्याव्या लागतील.
  • कंपन्यांना ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत केवायसी पूर्ण करावे लागतील

 

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI ने जूनमध्ये फास्टॅगबद्दल तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली, ज्यामध्ये फास्टॅग सेवा प्रदाता कंपन्यांची केवायसी प्रक्रिया सुरू करण्यासाठी १ ऑगस्ट तारीख निश्चित केली होती तर आता कंपन्यांकडे सर्व अटी पूर्ण करण्यासाठी १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून नवीन अटींनुसार नवीन फास्टॅग जारी करणे आणि री-फास्टॅग, सुरक्षा ठेव आणि किमान रिचार्जशी संबंधित शुल्क देखील NPCI द्वारे निर्धारित करण्यात आले आहेत.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.