Free Tailoring training for women – महिलांना मिळणार टेलरिंगचे प्रशिक्षण

Free Tailoring training for women


Telegram Group Join Now

Free Tailoring training for women

Free Tailoring training for women: An initiative has been taken for the implementation of the Pradhan Mantri Vishwakarma Yojana through the Jan Shikshan Sansthan Raigad, which is functioning in Raigad district through the Ministry of Skill Development and Industrial Development, Government of India. Through this women will get training in tailoring.

कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची अंमलबजा- वणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यातून महिलांना टेलरींगचे प्रशिक्षण मिळणार आहे.

२०२८ पर्यंत मोफत व्यवसायाभिमुख कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार _ Free Tailoring training for women

सहाण एकदंत नगर अलिबाग येथे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील जिल्ह्यातील पहिले सेंटर सुरू करण्यात आले व टेलर या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन १७ एप्रिल रोजी सहाण अलिबाग रायगड येथे संपन्न झाले. सदर योजनेत देश भरातील १००० पेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकार्माना २०२८ पर्यंत मोफत व्यवसायाभिमुख कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर सहा दिवसांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रति विद्यार्थी एकत्रित प्रोत्साहन भत्ता चार हजार रुपयांबरोबरच, मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र, प्रत्येकी १५ हजार रुपयांचे विश्वकर्मा किट अथवा व्हाउचर्स बरोबरच कौशल्य वृद्धी प्रशिक्षणासह ५ टक्के व्याजदराने तीन लाख रुपयापर्यंतची टप्या टप्याने कर्ज सुविधा देखील प्रशिक्षाणार्थ्यांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाच्या प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगड चे संचालक डॉ. विजय कोकणे यांनी व्यक्त केले. जे.एस.एस रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हजारो युवकांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सदर योजनेचा फायदा घेऊन नाव नोंदणी करावी असे उद्गार कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी व उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर यांनी व्यक्त केले.

भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत कार्यक्रम राबवित असतांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडच्या उपाध्यक्षा रत्नप्रभा बेल्हेकर यांच्या समवेत अकाउंट ऑफिसर प्रतिक्षा सचिन चव्हाण, प्रशिक्षक वृषाली भागवत सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व जन शिक्षण संस्थान रायगडचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी वेदांती पाटील व प्रशिक्षणार्थीच्या उपस्थितीत सदर उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला.
सदर प्रशिक्षण वर्गामध्ये टेलर व पार्लर वर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक वृषाली भागवत, रिद्धी पाटील व प्रतिक्षा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.

 

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. निशा मंगेश गोजे says

    मला पण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे?

Leave A Reply

Your email address will not be published.