घरकुल योजना : १० लाखांना पहिला हप्ता, ५ हजारांना जागा !
Gharkul Yojana List

राज्यात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत १०० दिवसीय महाआवास अभियान १ जानेवारी २०२५ ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत राबवले जात आहे. याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा २ मधील २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रे दिली जाणार आहेत.
१० लाख लाभार्थ्यांसाठी पहिला हप्ता
- वाटप कार्यक्रम २२ फेब्रुवारी २०२५ रोजी
- मुख्य समारंभ दुपारी ४:४५ वाजता, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
- ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हास्तरावर थेट प्रक्षेपण व मंजुरीपत्रे वितरण
उत्तर सोलापूर तालुक्यासाठी २०५० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी १०४९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील यांनी दिली.
१०० दिवसांत महत्त्वपूर्ण टप्पे
- १३ लाख घरकुलांना मंजुरी
- ३ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता (₹४५० कोटी वाटप)
- लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण
- ५,००० लाभार्थ्यांना घरासाठी जागा उपलब्ध
महाआवास अभियान ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे.