Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, ८१ हजार पगार, कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी!

Indian Coast Guard Recruitment


Telegram Group Join Now

मित्रांनो, जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध पदांसाठी भरती जाहर करण्यात आली आहे.इंडियन कोस्ट गार्ड रिजन इस्टमध्ये इंजिन ड्रायव्हर, फायरमॅन, एमटीएस, एमटी फिटर अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन कोस्ट कार्डमधील या नोकरीबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. indiancoastguard.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. मुख्यालय, कोस्ट गार्ड क्षेत्र मुंबई अंतर्गत इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सीएमटीडी (ओजी), एमटीएस, एमटी फिटर, फोर्कलिफ्ट ऑपरेटर, अकुशल कामगार, टर्नर” पदांच्या जागा भरण्यात येत आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी एकूण ३६ जागा भरण्यात येणार हायेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२४ आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आणि अर्ज लिंक आम्ही पुढे दिली आहे. 

 

Indian Coast Guard Recruitment

सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत इंडियन कोस्ट गार्डमध्ये ही भरती केली जाणार आहे. इंजिन ड्रायव्हर ते मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी भरती केली जाणार आहे (Indian Coast Guard Recruitment). या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वीची परीक्षा दिलेली असावी. याचसोबत डिप्लोमा/अप्रेंटिस / आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

पगार किती?
१. लस्कर, एमटीएस (शिपाई), एमटीएस (चौकीदार) आणि अकुशल या पदांसाठी दरमहा १८००० रुपये ते ५६९०० रुपये पगार देण्यात येईल.
२. फायरमन, सीएमटीडी (ओजी), एमटी फिटर, फोर्कलिफ्ट ऑपरेटर आणि टर्नर या पदांसाठी दरमहा १९९०० रुपये ते ६३२०० रुपये पगार देण्यात येईल.
३. फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी दरमहा २१७०० रुपये ते ६९१०० रुपये पगार देण्यात येईल.
४. इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर या पदांसाठी दरमहा २५५०० रुपये ते ८११०० रुपये पगार देण्यात येईल

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८००० ते ८११०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग चेन्नई, विशाखापट्टणम या ठिकाणी केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अधिकृत वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करुन घ्यावा. त्यानंतर द कमांडर, कोस्ट गार्ड रीजन, नेपियर ब्रिजच्या जवळ, चेन्नई येथे अर्ज पाठवायचा आहे.

शैक्षणिक पात्रता-
१. सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातुन १०वी उत्तीर्ण आणि जड आणि हलकी दोन्ही मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तसेच ड्रायव्हिंगचा २ वर्षांचा अनुभव आणि मोटर मेकॅनिझमचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
२. अन-कुशल या पदासाठी १० वी पास किंवा आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक. १ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र
३. टर्नर यासाठी १० वी पास किंवा आयटीआय प्रमाणपत्र आणि १ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.
४. फोर्क लिफ्ट ऑपरेटर या पदासाठी आयटीआयचे संबंधित प्रमाणपत्र आवश्यक आहे.
५. फायरमन या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक पास असणे आवश्यक
६. एमटी फिटर या पदासाठी १० वी पास असणे आवश्यक.
७. एमटीएस (चौकीदार) या पदासाठी १० वी पास असणे आवश्यक.
८. एमटीएस (शिपाई) या पदासाठी १० वी पास असणे आवश्यक.
९. फायर इंजिन चालक या पदासाठी १० वी पास असणे आवश्यक.
१०. लस्करया पदासाठी १० वी पास असणे आवश्यक.
११. सारंग लस्कर या पदासाठी १० वी पास असणे आवश्यक.
१२. इंजिन ड्रायव्हर या पदासाठी १० वी पास असणे आवश्यक.

 

अर्ज प्रक्रिया
-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्यासाठी https://indiancoastguard.gov.in/WriteReadData/Orders/202410081117220474250west.pdf या लिंकवर क्लिक करा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२४ आहे. नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.