Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



खुशखबर, आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अप्रेंटिसशिप मिळणार!

ITI Jobs in Same District


Telegram Group Join Now

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातच स्थानिक उद्योगात ITI Jobs in Same District शिकाऊ उमेदवारी अर्थात अँप्रेन्टीसशिप द्यावी, असे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली औद्योगिक आस्थापनांमध्ये उपलब्ध पायाभूत सुविधांचा विनियोग करून कुशल कारागिरास आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी, राज्यात ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना’ राबवण्यात येत आहे. याद्वारे दरवर्षी तब्बल एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांसह ३० किंवा त्यापेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या आस्थापनांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या किमान २.५ टक्के ते कमाल २५ टक्के शिकाऊ उमेदवारीच्या जागा करणे बंधनकारक आहे.

ITI Jobs 2025
या योजनेत २७ गटातील २५८ निर्देशित, ३५ क्षेत्रातील ४१४ वैकल्पिक, तंत्रज्ञ अंतर्गत सहा गटातील २० आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या १२३ व्यवसायांना शिकाऊ उमेदवारी लागू करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवारीचा कालावधी व्यवसायनिहाय ६ ते ३६ महिने आहे.



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.