Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


जमीन मोजणी शुल्कासाठी नवीन धोरण; नगरपालिका हद्दीसाठी तीन हजार शुल्क | Jamin Mojani Fee

Jamin Mojani Fee


Telegram Group Join Now

Jamin Mojani Fee: भूमी अभिलेख विभागाकडून केल्या जाणाऱ्या मोजणी शुल्काच्या (Jamin Mojani Fee) नवीन धोरणाची अंमलबजावणीला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामध्ये नवीन जमीन मोजणी धोरणानुसार नियमित जमीन मोजणीचा कालावधी नव्वद दिवसांच्या आत करताना जमीन मोजणीचा तातडी, अतितातडी हे प्रकार बंद केला आहे. त्याऐवजी नियमित आणि द्रुतगती असे मोजणीचे दोन प्रकार ठेवले आहेत. त्यामध्ये द्रुतगती जमीन मोजणीचा कालावधी तीस दिवस केला आहे. त्याचवेळी जमीन मोजणीसाठी यापूर्वी १३० दिवसांचा कालावधी होता. तो आता कमी करून ९० दिवसांवर आणण्यात आल्याने जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा तत्काळ होणार आहे.

Read This Also How To Apply For Mojani In Maharashtra – जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा?

Jamin Mojani Shulk

आपल्या मालकीच्या जमिनीची हम निश्चित करणे वा आपल्या ताब्यात असलेली जमीनीचे कागदोपत्री असलेले क्षेत्र नेमके कसे विस्तारलेले हे जाणून घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून वा जमिन मालकांकडून जमिन मोजणी केली जाते. ही जमीनमोजणी भूमिअभिलेख विभागाकडून केली जात असून त्यासाठी त्यांच्याकडून जमीन मोजणी शुल्काची आकारणी केली जाते. जमीन मोजणीचे पूर्वी असलेले धोरण वेळखाऊ करणारे असल्याने त्याबाबत शेतकरी वा जमीन मालकांकडून नाराजीचे सूर उमटत होते. त्याची दखल घेवून शासनाने जमीन मोजणीचे नवीन धोरण निश्चित केले आहे. त्याची आजपासून अंमलबजालवणी सुरू झाली आहे.

कंपन्यांसाठी वेगळे दर या व्यतिरिक्त कंपन्यांसाठी काही वेगळे दर निश्चित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये कंपन्या, इतर संस्था, विविध प्राधिकरणे, महामंडळे व भूसंपादन संयुक्त मोजणीसाठी सथ्हें नंबर, तसेच गट नंबर, पोटहिस्सा आणि सिटी सव्र्व्हे, फायनल प्लॉट क्रमांक, मंजूर रेखांकनातील एका भूखंडासाठी एक हेक्टरपर्यंत नियमित मोजणीकरिता तीन हजार रुपये, दुतगती मोजणीसाठी १२ हजार रुपये मोजणी शुल्क निश्चित करण्यात आलेले आहेत. त्याच सब्र्व्हे नंबरमधील पुढील प्रत्येक एक हेक्टरसाठी नियमित एक हजार ५०० रुपये व द्रुतगती मोजणीसाठी सहा हजार स्पये लागणार आहेत.

• पालिका हद्दीबाहेरील मोजणीसाठी दोन हजार शुल्क नगरपालिका हद्दीबाहेरील क्षेत्रासाठी
सब्र्व्हे नंबर, तसेच गट नंबर, पोटहिस्सा आणि सिटी सव्र्व्हे, फायनल प्लॉट क्रमांक, मंजूर रेखाकनातील एका भूखंडासाठी दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणीकरिता दोन हजार रुपये, द्रुतगती मोजणीसाठी आठ हजार रुपये मोजणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्याच सव्र्व्हे नंबरमधील पुढील प्रत्येक दोन हेक्टरसाठी नियमित एक हजार रुपये व द्रुतगती मोजणीसाठी चार हजार रुपये मोजणी शुल्क आकारले जाणार आहे

नगरपालिका हद्दीसाठी तीन हजार शुल्क
• नगरपालिका हद्दीमधील एका भूखंडासाठी एक हेक्टरपर्यंत नियमित मोजणीस तीन हजार रुपये, तसेच द्रुतगती मोजणीसाठी १२ हजार रुपये शुल्क निश्चित केले आहे. त्याच सव्र्व्हे नंबरमधील पुढील प्रत्येक एक हेक्टरसाठी नियमित एक हजार ५०० रुपये व द्रुतगती मोजणीसाठी सहा हजार रुपये मोजणी शुल्क आकारले जाणार आहेत.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.