ज्येष्ठ नागरिकांना आता आरोग्य योजनांचा थेट लाभ मिळणार, या लिंक वरून करा अर्ज!
jan arogya yojana card maharashtra online apply

भारत सरकारने ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ अंतर्गत ७० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे(Jan Arogya yojana card maharashtra online apply) . आता या वयोगटातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक-आर्थिक स्थितीची अट न लावता योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. या नव्या नियमानुसार, ७० वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ स्त्री-पुरुषांना स्वतंत्र ‘आयुष्मान भारत वय वंदन कार्ड’ आवश्यक असेल. आधारकार्डवर नमूद वयानुसार पात्रता ठरवली जाईल. ई-केवायसी ही प्रक्रिया अनिवार्य असून, यानंतरच कार्ड जारी होणार आहे.
वर्षभरात कधीही करा अर्ज (Arj Kasa Karaycha, How to Apply Link)
नोंदणीसाठी वर्षभर अर्ज करता येणार असून, ‘आयुष्मान अॅप’ व संकेतस्थळावरून प्रक्रिया करता येईल. स्थानिक सेतू केंद्र, आशा सेविका, ग्रामपंचायत केंद्रचालक, अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र तसेच स्वस्त धान्य दुकानदार है ई-केवायसीसाठी अधिकृत आहेत.