Krushi Karj Mitra Yojana Nodani – शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणर कर्ज; कृषी कर्ज मित्र योजना अर्ज सुरु

Krushi Karj Mitra Yojana Online Registration


Telegram Group Join Now

Krushi Karj Mitra Yojana Nondani:  Farmers are provided large scale credit through nationalized banks, cooperatives and private banks and credit unions for Kharif and Rabi seasons. In this, the tendency of farmers is more towards District Central Co-operative Bank. Loans are disbursed by the Co-operative Bank through various Executive Service Co-operative Societies. Generally farmers take new crop loans, medium and long term loans.

शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित करण्यात आला आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने व विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणुक वाढवून कृषीक्षेत्राचा विकास साधणे हा या योजनेचा उद्देश आहे.

कर्जासाठी ‘कृषी कर्ज मित्राची’ आवश्यकता का भासली?

शेतकरी हे खरीप आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर पीक कर्ज घेत असतात. हंगामात बदल करुन उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांचा प्रयत्न राहिलेला असतो. मात्र, पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणी नुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षीत स्वयंसेवकाची मदत/सहाय्य देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेउन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज आवश्यक आहे, अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार केल्यास शेतकऱ्यांस वेळेत कर्ज उपलब्ध होणार आहेत.

योजनेचे नावकृषी कर्ज मित्र योजना
कोणी लाँच केलेराज्य सरकार (Gov Of Maharashtra)
लाभार्थीशेतकरी (Farmer’s)
उद्दिष्टशेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता

कृषी कर्ज मित्र योजनेचा उद्देश

शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने व विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणुक वाढवून कृषीक्षेत्राचा विकास साधणे.
योजनेचे स्वरूप :-
दरवर्षी खरीप, रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात. लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता यात विषमता आढळून येते. कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकची भर पडणे आवश्यक आहे. सुक्ष्म निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याने दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु, कर्ज प्रक्रियेचे अज्ञान असल्यामुळे व वेळेच्या अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही.

प्रकरण मंजूर करण्यास असे आकारले जातात दर

अ) अल्प मुदतीचे कर्ज :-
१. प्रथमतः पीक कर्ज घेणारा शेतकरी: प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये १५०/-
ब) मध्यम व दिर्घमुदतीचे कर्ज :-
१. नविन कर्ज प्रकरण : प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये २५०/-
२. कर्ज प्रकरणाचे नुतनीकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये २००/-

कृषी मित्राचे कसे होते रजिस्ट्रेशन

कृषी कर्ज मित्र नोंदणी :-
अ) कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
ब) नोंदणी झालेल्या इच्छूक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
क) जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती द्यावी. कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजूरीसाठी बँकेमध्ये सादर करेल. कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थाच्या भूमिकेऐवजी सहायक व सल्लागाराची भूमिका बजावेल.

Krushi Karj Mitra Yojana Online Registration Form

Important Things For Krushi Karj Mitra Yojana Nondani

  • आधार क्रमांक
  • बँक खाते क्रमांक (आधार संलग्नित)
  • ई-मेल आयडी
  • बँकचे नांव
  • शाखा
  • शैक्षणिक अहर्ता

कृषी कर्ज मित्रास सेवाशुल्क देण्याची कार्य पध्दती

कृषी कर्ज मित्रास सेवा शुल्क देण्यासाठी तालुका स्तरावर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात यावी.

तालुका स्तरीय समिती

  • गट विकास अधिकारी
  • सहायक निबंधक सहकारी संस्था
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रतिनिधी
  • जिल्हा अग्रणी बँकेचा प्रतिनिधी
  • तालुका कृषी अधिकारी
  • कृषी अधिकारी पंचायत समिती

GR, शिफारस पत्र डाउनलोड करा – येथे क्लिक करा



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.