आता प्रत्येक मजुराला मिळणार स्मार्ट रेशन कार्ड | Labour smart card download
Labour smart card download
Labour smart card download: कोणत्याही राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मजुरांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात येणार आहे. राज्यातील कुठल्याही रेशन दुकानात त्यांना धान्य उपलब्ध करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पुढील शंभर दिवसांमध्ये करायच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री म्हणाले, आगामी वर्षात 25 लाख नवीन रेशन कार्डचे ई-केवायसी करून प्रमाणीकरण करा. मागील 6 महिन्यांत एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी. शिधापत्रिकामधून मयत व्यक्ती वगळाव्या, 100 पेक्षा जास्त वय असणार्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करावी. तसेच संगणकीकृत न झालेल्या 14 लाख लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबवावी. अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे, यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत. गरजू लाभार्थ्यांना सणांच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. या आनंदाचा शिधा वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.