Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


लाडकी बहीणच्या घोषणेनंतर सव्वा महिन्यामध्ये ४१ हजार नवी खाती उघडण्यासाठी महिलांची ‘पोस्टा’ला पसंती!

Ladki bahin New Account in Post Office


Telegram Group Join Now

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर राज्यात महिलांचे बँक खाती उघडण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे टपाल विभागात सव्वा महिन्यांत ४१ हजार २२५ महिलांनी बचत खाती उघडली. त्यामुळे एरवी मोकळी असलेली टपाल कार्यालये आता गजबजू लागली आहेत. राज्य शासनाने २०२४ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी लाभार्थी महिलांचे बँक खाते असणे बंधनकारक आहे. या योजनेच्या घोषणेनंतर बँकेत आणि टपाल कार्यालयांमध्ये खाते उघडण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. मात्र, खासगी किंवा सरकारी बँकेत खाते उघडण्यासाठी विविध कागदपत्रांचा तगादा लावला जातो. तसेच तेथील रहिवासी असलेला पुरावा द्यावा लागतो. मात्र, टपाल कार्यालयांमध्ये केवळ आधार कार्ड दाखवून कोणत्याही जिल्ह्यातील नागरिकांना बचत खाते उघडता येत आहे. त्यामुळे टपाल कार्यालयांमध्ये खाते उघडण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे.

Is Post Office Account Valid For Mazi Ladki Bahin Yojana

Ladki bahin New Account in Post Office
पुणे टपाल विभागाअंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे विभागात २ हजार १८३ शाखा टपाल कार्यालय, ४९६ उपटपाल कार्यालय आणि १० मुख्य टपाल कार्यालये आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर १ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान पुणे विभागात ४१ हजार २२५ बचत खाती उघडली आहेत. जुलै महिन्यात २९ हजार ६४१ आणि ऑगस्ट महिन्यात ११ हजार ५८४ बचत खाती उघडली आहेत. पुणे विभागात सर्वाधिक १० हजार २८७ बचत खाती सोलापूर मुख्य टपाल कार्यालयात उघडली आहेत. यानंतर पंढरपूर मुख्य टपाल कार्यालयात ६ हजार ५१२ आणि पुणे शहर पूर्व मुख्य टपाल कार्यालयात ५ हजार ४३८ बचत खाती उघडली आहेत. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही पोस्टात बचत खाती उघडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.