लाडकी बहीण योजनेचे नवीन नियम बदलणार! सध्या मिळणार १,५०० रुपयेच! दोनच महिलांना लाभ मिळणार!
लाडकी बहीणचे निकष बदलणार सध्या १,५०० रुपयेच!
सध्या महाराष्ट्रात भाजप-महायुतीच्या ऐतिहासिक विजयामध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे महायुतीचे नवीन सरकार ही योजना सुरू ठेवणार आहे. मात्र, योजनेतील काही निकषांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्रचारादरम्यान महायुतीने दरमहा २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सध्या १,५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याशिवाय, या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त दोन महिलांना देण्याचा विचार सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी, या योजनेच्या माध्यमातून सरकारने राज्यातील २ कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्यांची रक्कम जमा केली होती.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील २ कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्यांची रक्कम जमा करून सरकारने महिलांमध्ये या योजनेबाबत विश्वास निर्माण केला. यामुळे महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला आणि महायुतीला प्रचंड पाठिंबा मिळाला. महाविकास आघाडीकडून ही योजना महायुतीच्या सत्तेत बंद होईल, असा प्रचार केला गेला, मात्र ‘लाडकी बहीण’ योजना सुरू ठेवण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे.
तथापि, आर्थिक धोरणांमध्ये शिस्त आणण्याच्या उद्देशाने या योजनेतील काही निकष बदलण्याचा विचार सुरू आहे, ज्यामुळे काही महिलांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या सूत्रांनुसार, या बदलांमुळे राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. ‘लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्र सरकारने २८ जून २०२४ रोजी जाहीर केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य पुरवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात, मात्र त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसणे आवश्यक आहे, असे सध्याचे निकष आहेत.