नववी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य : अर्ज प्रक्रिया सुरू Lodha Genius Programme Application Form
Lodha Genius Programme Application Form
Lodha Genius Programme Application Form: लोढा फाऊंडेशनच्या नुकत्याच स्थापन झालेल्या लोढा जिनियस प्रोग्रामतर्फे अशोका विद्यापीठाच्या भागीदारीने नववी ते बारावीच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः प्रायोजित बहुवर्षीय शैक्षणिक कार्यक्रमासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया १ डिसेंबर २०२४ पासून १५ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. अभिषेक लोढा आणि त्यांच्या कुटुंबाने लोढा फाऊंडेशनला दिलेल्या निधीनंतर लगेच हा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे.
लोढा जिनियस प्रोग्राम हा बहुवर्षीय उपक्रम आहे, ज्यामध्ये दरवर्षी अशोका विद्यापीठात चार आठवड्यांचा कॅम्पस अनुभव आणि वर्षभर सुरू राहणारे शिक्षण यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम सर्व प्रमुख परीक्षा मंडळांशी सुसंगत आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास अधिक सखोल करण्यास व निवडलेल्या क्षेत्रात करिअरच्या विविध मार्गांचा शोध घेण्यास याची मदत होते. या उपक्रमात सखोल विज्ञान व गणिताचे अभ्यासक्रम, उपयुक्त जीवनकौशल्ये, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विशेष इंटर्नशिप या संधींचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नोबेल पुरस्कार विजेत्यांसह नामांकित शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग असून विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेपासून त्यांच्या पहिल्या नोकरीपर्यंत मदत करण्यात येते.
काही निवडक विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय एसटीईएम कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी शिष्यवृत्ती संधीदेखील उपलब्ध करून दिल्या जातात.
लोढा फाऊंडेशनच्या हेड ऑफ एज्युकेशन महिका शिशोदिया म्हणाल्या, लोढा जिनियस प्रोग्रॅम हा नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या लोढा फाऊंडेशनचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. भारतभरातील विशेष प्रतिभावान मुलांसाठी, त्यांच्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता, शिक्षणाचा दर्जा उंचावणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुलांचे मूल्यमापन एका प्रवेश परीक्षेद्वारे केले जाते. या परीक्षेत विशिष्ट अभ्यासक्रमावर न भर देता वैज्ञानिक तर्कशक्ती, गणित आणि लॉजिक यावर या परीक्षेत भर देण्यात येतो. अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी www.lodhageniusprogramme.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.