महा ई ग्राम अँप सरकारचे नवीन ऍप्लिकेशन – Maha E Gram App Download

Maha E Gram App Download


Telegram Group Join Now

नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने जास्तीत जास्त सुविधा देण्याकडे शासनाचा कल आहे. (Maha E gram App Download) आता ग्रामपंचायतमधील सर्व दाखले घरबसल्या मिळणार आहेत. ग्रामविकास व पंचायत राज विभागाने महा ई ग्राम उपक्रम हाती घेतला आहे. यात सर्व दाखले, प्रमाणपत्र मिळणार आहेत. त्यासाठी नागरिकांना महा ई ग्राम अँप डाऊनलोड करावे लागणार आहे. मात्र, जिल्ह्यात किती लोकांनी अँप डाऊनलोड केले याची माहितीच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे नाही. पूर्वी केवळ जमिनीचा सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने काढला जात होता. मात्र, मोबाइल अप्लिकेशनच्या माध्यमातून आगेचा उतारा, ग्रामपंचायतीत मिळणारे जन्म, मृत्यू प्रमाणपत्र यासारखे अनेक दाखले मिळणार आहेत.

Maha E Gram App Download

 

वेळेची होणार बचत महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट अँप  मोबाइलमध्ये इन्स्टॉल केल्यास घरबसल्या ग्रामपंचायतमधून मिळणारे दाखले काढता येणार आहेत. यामुळे नागरिकांच्या वेळेत बचत होणार असून, दाखल्यासाठी ग्रामपंचायतीत चकरा माराव्या लागणार नाहीत. मात्र, यासंदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांत म्हणावी तितकी जनजागृती नाही.

ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, आपण यापूर्वी केलेल्या कराचा भरणा, ही माहिती अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. ग्रामविकास विभाग ई ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचे अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून घरबसल्या दाखले मिळतील.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.