Mahamesh Mendhi Charai Anudaan Maharashtra Application – मेंढपाळ कुटूंबांना २४०००/- चराई अनुदान, लगेच करा अर्ज
Mahamesh Mendhi Charai Anudaan Maharashtra Arj
Table of Contents
Mahamesh Mendhi Charai Anudaan Maharashtra Application
Mahamesh Mendhi Charai Anudaan Maharashtra Application: Under the state-level scheme, the shepherd families belonging to the backward category of the nomadic tribe-C, Dhangar and similar communities, will receive Rs. 6000/- making a total of Rs. 24000/- Grazing Subsidy. Know More about Mahamesh Mendhi Charai Anudaan Maharashtra Application, Mendhi Charai Anudaan Maharashtra Subsidy Arj at below:
राज्यातील भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळ कुटूंबांना राज्यस्तरीय योजनेंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६०००/- असे एकूण रु. २४०००/- चराई अनुदान
How To Apply For Mahamesh Mendhi Charai Anudaan Maharashtra Application
1. अर्जदारास त्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक वापरून एकदाच नोंदणी करता येईल.
2. जर तुम्ही या आधी नोंदणी केली असल्यास “केलेले अर्ज” हा पर्याय निवडुन तुम्ही तुमची माहिती पाहु शकता व त्यामध्ये बदल करू शकता.
3. आपण या आधी नोंदणी केली नसल्यास “नवीन अर्जदार नोंदणी” हा पर्याय निवडुन नोंदणी करून योजनेचा पर्याय निवडु शकता.
4. अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
5. अर्ज करण्याआधी योजेने संबंधित सर्व माहिती व निवडीचे निकष वाचुन घ्यावेत.
6. अर्जदार पात्रता ही योजनेच्या निकषावरून ठरविली जाईल.
7. अर्जाची पावती व अर्जाची प्रत ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपणास डाऊनलोड करता येईल.
टीप :-
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ जिल्ह्यात राबवली जाणार आहे .
2. सदर योजनेंतर्गत राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचीत केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजामधील ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन असेल, अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात यावा.
लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-Who is Eligible For Mahamesh Mendhi Charai Subsidy
१. सदर योजनेचा लाभ राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजामधील ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ घेता येईल.
२. लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
३. लाभधारकांची निवड करताना, महिलांकरिता ३०% व दिव्यांगाकरिता ३% आरक्षण देण्यात यावे.
४. लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे.
५. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतींनिधी नसावा.
• योजनेचा उद्देश :- Objective Of Mahamesh Mendhi Charai Yojana
१. राज्यातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराई करिता जून ते सप्टेंबर या ४ महिन्याच्या कालावधीमध्ये चराई अनुदान देऊन या व्यवसायास चालना देणे.
२. राज्यातील मेंढ्यांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबविणे किंबहुना त्यामध्ये वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
३. राज्यातील मेंढीपालन व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे.
• योजनेची वैशिष्टे :- Mahamesh Mendhi Charai Yojana Features
१. मेंढी पालन व्यवसाय हा पुर्णपणे स्थलांतरित पध्दतीने केला जातो. मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पाण्याच्या शोधात साधारणपणे माहे ऑक्टोबर पासून भटकंती करीत असतात. भटकंती काळात मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पिण्याचे पाण्याच्या शोधात सतत स्थलांतरण करत असतात. पावसाळी हंगामामध्ये मुळस्थानी मेंढपाळ परत आल्यानंतर त्या भागामध्ये पाऊस फार अत्यल्प होत असल्यामुळे चारा उपलब्ध होत नाही.
२. जुन ते ऑक्टोबर या काळात मेंढपाळ नजीकच्या स्थानिक ठिकाणी, नदी किनारी, शेतकर्यांच्या बांधावर तसेच नजीकच्या वन क्षेत्रावर त्यांच्या मेंढ्यांची चराई करीत असतात. हल्लीच्या काळामध्ये शेतकरी शेतामध्ये तणनाशक तसेच कीटकनाशक औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. तसेच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण सुरू असल्यामुळे बर्याच रसायन कंपण्यामधील कचरा पाणी नदी-नाल्यामध्ये सोडण्यात येते. त्यामुळे भटकंती काळात मेंढ्यांचा संपर्क या विषारी रसायनांसी आल्यामुळे विषबाधा होण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. यामुळे मेंढपाळांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. दिवसेंदिवस ही समस्या वाढत असल्यामुळे या कालावधी मध्ये त्यांच्या मेंढ्यांना चारा उपलब्ध करणेकरिता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे चराई करिता शासनाकडून अर्थ सहाय्य उपलब्ध झाल्यास त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन असणार्या मेंढपाळ कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी रु. २४,०००/- चराई अनुदान वाटप करणे
अ.क्र. |
तपशील |
लाभार्थी संख्या |
मंजूर निधी (रु.) |
---|---|---|---|
1 |
राज्यातील भटक्या जमाती- क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन असणार्या कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६,०००/- असे एकूण २४,०००/- चराई अनुदान वाटप करणे |
३४७० |
८.३३ कोटी |
Documents Required For Mahamesh Mendhi Charai Anudaan Yojana
प्राथमिक निवड झाल्यानंतर सादर करावयाचे कागदपत्रे –
१) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचा)
२) आधार कार्ड
३) रेशन कार्ड
४) बँक पासबुक
५) मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्र नमुना क्र. १ नुसार)
६) अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. २ नुसार)
७) स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. ५)
८) दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)