Maharashtra Pension Scheme For Journalist – ज्येष्ठ पत्रकारांना मिळणार आता २० हजार सन्माननिधी

Maharashtra Pension Scheme For Journalist details in Marathi


Telegram Group Join Now

Maharashtra Pension Scheme For Journalist

Maharashtra Government Pension Scheme To Journalists: The state government has decided to increase the honor fund of senior journalists of the state from eleven thousand to twenty thousand rupees. Under the ‘Acharya Balshastri Jambhekar Jyeshtha Journalist Samman Yojana’, eligible senior journalists in the state are currently receiving an honor fund of Rs 11,000 per month. Now it has been decided to increase this amount by nine thousand rupees.

 बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून राज्यातील निवृत्त पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सन्माननिधी योजनेची दरमहा देण्यात येणारी रक्कम ११ हजारांऐवजी २० हजार रुपये करण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला. यामुळे आता निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा २० हजार रुपये सन्माननिधी मिळणार आहे.

Balshastri Jambhekar Journalist Samman Yojana  Maharashtra

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेत अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या ११ हजार रुपये सन्मान निधी दर महिन्याला मिळतो. मात्र, त्यात वाढ करण्याची मागणी पत्रकारांकडून होत होती. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांचे निवृत्ती वेतन २० हजार रुपये करण्यात याले, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ही मागणी तत्काळ मान्य करत मुख्यमंत्री शिंदे यांनी सन्मान निधी योजनेची रक्कम २० हजार रुपये करण्याची घोषणा केली होती.

 Maharashtra Acharya Balshastri Jambhekar Sanman Yojana List of Beneficiaries

आता याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या निर्णयाबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Acharya Balshastri Jambhekar Sanman Yojana

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे राबवण्यात येते योजना

राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकार सन्मान निधीची योजना राबविण्यात येते. या योजनेचे निकष व कार्यपद्धतीनुसार केवळ महाराष्ट्रातील अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ मिळतो. ही मासिक अर्थसहाय्याची रक्कम ‘शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी’ मधील ५० कोटी इतक्या मुदत ठेवीच्या व्याजाच्या रकमेतून देण्यात येते. मासिक २० हजाराची ही रक्कम ज्येष्ठ पत्रकाराच्या बँक खात्यात थेट जमा (Direct Benefit Transfer) होणार आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची रक्कम ३५ कोटींवरून वाढवून ५० कोटी करण्यात आला आहे.

Maharashtra approves pension scheme for senior journalists

यासंदर्भात गेल्या वर्षीच्या विधानसभा अधिवेशनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत पत्रकारांच्या सन्मान निधीसंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्थसहाय वाढविण्याची घोषणा केली होती.

Acharya Balshastri Jambhekar Sanman Yojana (ABJSY): Benefits 

  • A retirement pension of Rs. 20,000

Acharya Balshastri Jambhekar Sanman Yojana (ABJSY): Eligibility

  • Senior journalists from Maharashtra state
  • Retired senior journalist who has crossed 60 years of age
  • The journalists who worked for more than 20 years in the field

Acharya Balshastri Jambhekar Sanman Yojana (ABJSY): Objective

  • To provided financial assistance to the senior journalists in the state
  • To provide pension to the retired journalists

What is the pension for journalist?
A monthly pension of ₹10,000/- will be given to the eligible media persons.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. रमेश झवर says

    खूपच विलंब झाला आहे. हा विलंब टाळता आला असता. अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यावर नंतर लगेच रक्कम ट्रान्स्फर करता आली असती.
    -रमेश झवर

Leave A Reply

Your email address will not be published.