Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


खुशखबर, वीज बिलावर शुल्क माफ करा, वीज पुरवठा तोडलेल्यांसाठी महावितरणची अभय योजना 2025

Mahavitaran Abhay Yojana 2025


Telegram Group Join Now

विलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने ‘अभय योजना’ अंमलात आणली आहे. ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार माफ करण्यात येणार आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ हजार ग्राहकांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी १ सप्टेंबरपासून लागू अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या ऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Abhay Yojana 2024 Mahavitaran.jpg

जिल्ह्यात महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी  ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ आहे. या ११ हजार ग्राहकांकडून महावितरणला मूळ विलाची रक्कम तसेच व्याज आणि विलंब आकार येणे आहे. या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकार । स्वरुपातील दंड माफ करण्यात येईल. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. असा लाभ घेता येणार आहे.

योजनेचे फायदे आणि निकष :

  • ग्राहकांनी देय असलेल्या रकमेतून १००% विलंब आकार आणि व्याज माफ केले जाईल आणि १००% मुळ थकबाकी रक्कम भरल्यानंतर कायमस्वरूपी (PD) वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
  • ग्राहकांना थकबाकीची देय रक्कम १००% एकरकमी भरण्याचा किंवा किमान ३०% डाऊनपेमेंटसह जास्तीत जास्त ०६ हफ्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
  • उच्चदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर ५% अतिरिक्त सवलत मिळेल तसेच लघुदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर १०% अतिरिक्त सवलत मिळेल.

अभय योजनेचा लाभ कसा घ्यायचा जाणून घ्या

संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल पवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असणार आहे अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांनी दिली आहे.

या योजने साठी ऑनलाईन अर्ज करा 



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.