Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या २६ हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला मुदतवाढ | Maze pasantiche cidco che ghar yojana online

Maze pasantiche cidco che ghar yojana online


Telegram Group Join Now

Maze pasantiche cidco che ghar yojana online: ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेत सिडकोने ठरवलेल्या २६,००० घरांच्या सोडतीची अर्ज नोंदणी ११ डिसेंबरपर्यंत वाढवल्याची घोषणा सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली आहे. त्यामुळे घरांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील विविध ठिकाणी मध्यम आणि निम्न-उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया सुलभ व सुस्पष्ट ठेवली असून नागरिक ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. या मुदतवाढीमुळे नागरिकांना आपली निवासाची स्वप्ने साकार करण्याची संधी मिळणार आहे.

CIDCO Lottery 2024 Last Date

आतापर्यंत ८८,००० हून अधिक इच्छुकांनी ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेसाठी अर्जनोंदणी केली आहे. अर्ज नोंदणीसाठी एका महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने, अर्जदारांची संख्या सव्वा लाखांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दसऱ्याच्या दिवशी वाशी, खारघर, मानसरोवर रेल्वेस्थानक, खांदेश्वर रेल्वेस्थानक, आणि तळोजा या ठिकाणी असलेल्या २६,००० घरांसाठी सिडकोने सोडतीची प्रक्रिया सुरू केली होती. याचवेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने अर्ज प्रक्रियेत काही अडथळे आले. या योजनेत पहिल्यांदाच सिडको मंडळाने अर्जदारांनी त्यांची पात्रतेची कागदपत्रे जोडण्याची अट घालून सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची मागणी अर्जदारांकडून केली जात होती. अखेर, नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देत, सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अर्जनोंदणीची अंतिम तारीख ११ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.

‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) श्रेणीतील नागरिकांसाठी अर्ज करता येईल. सहा लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणारे अनेक नागरिक एलआयजी श्रेणीत अर्ज करत असल्याने वर्षाला २० ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न असणारेही या योजनेसाठी अर्ज करत आहेत. तळोजा परिसरात प्रदूषणाचा काहीसा त्रास असला तरी, या ठिकाणी असलेली १३,००० घरे सोडतीच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक नागरिकांनी सिडको मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://cidcohomes.com) भेट देण्याचे आवाहन सिडको मंडळाने केले आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.