Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


MGNREGA Card Update in Marathi – राज्यात पाच वर्षांत २ लाखांवर मनरेगा जॉब कार्ड रद्द

MGNREGA Card Update in Marathi


Telegram Group Join Now

MGNREGA Card Update in Marathi

ग्रामीण भागात एकीकडे रोजगार मिळत नसताना दुसरीकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत अनेक मजुरांचे जॉब कार्ड रद्द करण्यात आले आहे. २०१९-२० ते २०२४ या पाच वर्षात महाराष्ट्रात २ लाख १४ हजार ३०० मनरेगा जॉब कार्ड रद्द करण्यात आले. राज्यात २०२२-२३ मध्ये ७२ हजार ८७२, वर्ष २०२३ मध्ये ३७ हजार ६५१ तर चालू २०२४ वर्षात ५ हजार ११ मजुरांचे जॉब कार्ड रद्द करण्यात आले आहे. तर देशात याच कालावधीत ४ कोटी ४३ लाख ४६ हजार ६१ कार्ड रद्द करण्यात आले आहे. चुकीची माहिती दिलेले तसेच बनावट जॉब कार्ड, कुटुंबाची काम करण्याची इच्छा नसणे, गावातून कुटुंबांनी स्थलांतर करणे, कार्ड असलेल्या व्यक्तींचा मृत्यू होणे या कारणांमुळे हे जॉब कार्ड रद्द करण्यात आले आहेत. महात्मा गांधी नरेगा अंतर्गत २६२ कामांचा समावेश आहे.

राज्यात सरासरी ४० दिवसांचा रोजगार

ग्रामीण भागात कुटुद्यांना रोजगाराची गरज असते. मात्र महाराष्ट्रात २०१९-२० मध्ये प्रत्येक कुटुंबाला सरासरी ४० दिवसांचा रोजगार मिळाला होता. त्यानंतर २०२० ते २०२२ या वर्षांच्या दरम्यान सरासरी रोजगार ४० दिवसच राहिला. २०२२-२३ मध्ये यात घट होऊन हा ३७.१६ दिवसांवर आला होता. २०२३-२४ मध्ये यात वाढ झाली असून सरासरी रोजगार ४७ दिवसांवर आला आहे. देशात ही सरासरी ४७ ते ५२ दिवसाची आहे.

कुटुंबाला १०० दिवसाच्या रोजगाराची हमी केंद्र सरकार ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला देते. महाराष्ट्र सरकार १०० दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या अकुशल रोजगाराची हमी देते. ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड मिळण्याचा हक्क आहे. ज्यामध्ये घरातील सर्व प्रौढ सदस्यांची नावे आणि छायाचित्रे असतात, जेणेकरून ते कामाची मागणी करू शकतील आणि काम मिळवू शकतील. जॉब कार्ड हे एक प्रमुख दस्तऐवज आहे. मजुराने मागणी केल्यानंतर १५ दिवसाचे तो राहत असलेल्या ठिकाणापासून ५ किमीच्या आत उपलब्ध करून न दिल्यास संबंधित मजुराला मग्रारोहयो च्या नियमांनुसार बेरोजगारी भत्ता मिळण्याचा हक्क आहे

काम मिळालेल्या मजुरांची संख्या वाढली

राज्यात रोजगार हमी योजनेवर काम मिळालेल्या मजुरांची संख्या वाढती आहे. २०१९-२० मध्ये २७ लाख ४६ हजार ३ एवढी होती. त्यात आता वाढ झाली असून २०२३-२४ मध्ये ही संख्या ४१ लाख २९ हजार ५२३ झाली आहे. देशात २०१९- २० मध्ये ७ कोटी ८८ लाख १३ हजार ४६६ मजुरांना काम मिळाले होते. त्यात वाढ होऊन २०२३-२४ मध्ये ही संख्या ८ कोटी ३४ लाख ३९ हजार १५ एवढी आहे. २०२० ते २०२२ या वर्षात च्या तुलनेत यात घट झाली आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.