लॉ प्रवेश २०२४-विधि प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, तिसऱ्या वर्षासाठीची नोंदणी सुरु
MH Law Admission 2024
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने पाच वर्षे विधि अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ११ जुलैपासून प्रवेशासाठी नोंदणी करता येणार असून प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २९ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सीईटी कक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विधी तीन वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ११ ते १८ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. २३ जुलै रोजी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर २३ ते २६ या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात. सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ११ ते १८ जुलै या कालावधीमध्ये बहुतांश सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत. त्यात अभियात्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १४ जुलैपासून सुरू होणार आहे.