लॉ प्रवेश २०२५-तीन वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू
MH Law Admission 2025
MHT CET Law Admission 2025
MH Law Admission 2025: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) टप्प्याटप्याने विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आली असून एमबीए / एमएमएस, एमएड, एमपीएड आणि एमसीए या अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता विधि (तीन वर्षे) अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रिया शुक्रवारपासून ( २७ डिसेंबर) सुरू करण्यात आली आहे.
सीईटी सेलने विविध अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर टप्प्याटप्याने सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
MAH LLB CET 2025-26
विधि तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नोंदणी करण्यासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षा ही २० आणि २१ मार्च २०२५ रोजी होणार आहे.
अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असून टप्याटप्याने सर्व अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल.
CET Cell Maharashtra: सीईटी सेल बद्दल-
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्काचे नियमन) अधिनियम, २०१५ च्या कलम १० नुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना केली आहे. CET सेल महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश परीक्षा घेते. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कृषी, कायदा, वैद्यकीय, आयुष आणि ललित कला यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे.
अर्जाची लिंक- या लिंकवर क्लिक करा आणि अर्ज भरा
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने पाच वर्षे विधि अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ११ जुलैपासून प्रवेशासाठी नोंदणी करता येणार असून प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २९ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सीईटी कक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विधी तीन वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ११ ते १८ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. २३ जुलै रोजी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर २३ ते २६ या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात. सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ११ ते १८ जुलै या कालावधीमध्ये बहुतांश सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत. त्यात अभियात्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १४ जुलैपासून सुरू होणार आहे.