म्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी सोडत; लवकरच सोडतीच्या तारखेची घोषणा | Mhada 2030 Registration Process
Mhada 2030 Registration Process
Table of Contents
Mhada Mumbai 2030 Registration Process
Mhada 2030 Registration Process : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी १३ सप्टेंबरला सोडत काढली जाणार व्होती. मात्र काही कारणाने अर्जविक्री-स्वीकृतीसह सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने सोडत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता नक्की सोडत केव्हा जाहीर होणार याकडे अर्जदारांचे, इच्छुकांचे लक्ष लागले आहे. त्यानुसार मुंबई मंडळाकडून सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
Mhada Sodat Date
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यातही ७ किंवा ८ ऑक्टोबरला सोडत जाहीर व्होण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाकडून अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटातील २०३० घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत काढण्यात आली. तर या सोडती अंतर्गत अर्जविक्री- स्वीकृतीस ९ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली. ही प्रक्रिया सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याने मुंबई मंडळाने सोडतीस १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या सोडतीतील सर्वच योजनेतील घरे प्रचंड महाग असल्याने सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे अर्जविक्री-स्वीकृतीची ४ सप्टेंबर अशी अंतिम मुदत पुढे ढकलत या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार मागील आठवड्यात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अर्जविक्री-स्वीकृतीची अंतिम तारीख १९ सप्टेंबर अशी करण्यात आल्याचे जाहीर केले.
तर दुसरीकडे सोडतीतील पुनर्विकासाअंतर्गत प्राप्त झालेल्या ३७० घरांच्या किमतीतही १० ते २५ टक्क्यांनी कपात केली. या सर्व पार्श्वभूमीवर साहजिकच १३ सप्टेंबर रोजी होणारी सोडत पुढे गेली. दरम्यान सोडतीची नवीन तारीख लवकरच जाहीर करू असे मुंबई मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही नवीन तारीख तसेच पात्र अर्जदारांची प्रारूप यादी अंतिम यादी केव्हा प्रसिद्ध होणार हेही अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सोडतीच्या तारखेकडे आणि सोडत पूर्व प्रक्रियेच्या वेळापत्रकाकडे अर्जदार, इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
Mhada Home 202r Lottery Time Table
अर्जदार आणि इच्छुकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. कारण मुंबई मंडळाने सोडतपूर्व प्रक्रियेचे वेळापत्रक आणि सोडतीची तारीख निश्चित केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. ७ आणि ८ ऑक्टोबर अशा दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी जी कोणती तारीख गृहनिर्माण मंत्र्यांकडून अंतिम होईल त्या तारखेला सोडत काढण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यानुसार एक- -दोन दिवसांत तारीखेची घोषणा मंडळाकडून केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. त्याच वेळी वांद्रयातील रंगशारदा सभागृह किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोडत होणार हेही एक-दोन दिवसांत अंतिम केले जाणार आहे.
Mhada Home Registration 2024
सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसाठी असणारी म्हाडाच्या मुंबईतील २०३० घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अवघ्या काही तासांत संपणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी १२ वाजता गो लाईव्ह उपक्रमांतर्गत नोंदणी व अर्ज स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. या सोडतीत पहाडी गोरेगाव, अॅण्टॉप हिल वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड या गृहनिर्माण प्रकल्पांतील विविध उत्पन्न गटातील सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीचा अर्ज भरताना म्हाडाने काही प्रमाणपत्रे बंधनकारक केली आहेत. जर प्रमाणपत्र म्हाडाला अर्ज भरतानाच उपलब्ध करून दिली तर सोडत झाल्यानंतरच अवघ्या काही दिवसात घरांचा ताबा मिळणार आहे.
• म्हाडाच्या सोडतीचे माहितीपुस्तक शुक्रवारी दुपारपासून उपलब्ध असणार आहे.
• म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला (housing.mhada.gov.in) भेट द्या. ■ अर्जदाराचे नाव, पासवर्ड तयार करून स्वतःची नोंदणी करा.
• तुमच्या उत्पन्न गटानुसार सोडत आणि योजना निवडा.
• सोडतीसाठी उत्पन्न गटानुसार नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा.
• नावनोंदणीसाठी म्हाडाच्या मोबाईल अॅप्लिकेशनला भेट द्या.
गटांची मर्यादा
अत्यल्प उत्पन्न गट : ६ लाख रुपयांपर्यंत
अल्प उत्पन्न गट: ९ लाख रुपयांपर्यंत
मध्यम उत्पन्न गट : १२ लाख रुपयांपर्यंत
उच्च उत्पन्न गट : १२ लाख रुपयांहून अधिक
ही कागदपत्रे तयार ठेवा
पॅनकार्ड, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, रद्द चेक,
करभरणा पावती, चालक परवाना, पासपोर्ट आकाराची
छायाचित्रे, जन्म प्रमाणपत्र, अर्जदारांचे संपर्क तपशील
Kahi nahi
Fome kshala bharaycha ani kuthe bharaycha
Fome kshala bharaycha