MHADA Bumper Lottery Update – राज्यभरात ‘म्हाडा’ बांधणार १३ हजार घरे

MHADA Bumper Lottery Update


Telegram Group Join Now

MHADA Bumper Lottery Update: Common people of the state will now be able to get ‘Mhada’ house. In the financial year 2024-25, MHADA has decided to build as many as 13 thousand 46 houses across the state. A provision of Rs.8 thousand 310 crores has been made for this purpose. These houses will be set up in Mumbai, Konkan, Pune, Chhatrapati Sambhajinagar, Nashik and Amravati regional circles of MHADA.

राज्यातील सर्वसामान्यांना आता ‘म्हाडा’चे घर मिळू शकणार आहे. २०२४- २५ या आर्थिक वर्षात म्हाडाने राज्यभरात तब्बल १३ हजार ४६ घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जवळपास ८ हजार ३१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही घरे म्हाडाच्या मुंबई, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व अमरावती या प्रादेशिक मंडळांत उभारली जाणार आहेत.

म्हाडाकडून बांधल्या जाणाऱ्या या घरांमुळे सर्वसामान्यांचे गृहस्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. यामध्ये मुंबई मंडळामध्ये ३,६६० सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ५३२६.८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोंकण मंडळाअंतर्गत ५,१२२ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी १,४६०.१५ कोटी रुपये, पुणे मंडळात १,५०६ सदनिकांसाठी ४७३.७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडाच्या नागपूर मंडळातर्फे १,०७६ सदनिकांच्या निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यासाठी ६०७.२१ कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत ५९० सदनिकांचे बांधकाम करण्यासाठी १९३.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिक मंडळाअंतर्गत १,०३७ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी अर्थसंकल्पात १६८.६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांकडून पसंती
■ म्हाडाकडून बांधली जाणारी घरे स्वस्तात उपलब्ध होत असल्याने
सर्वसामान्यांकडून त्याला मोठी पसंती दिली जाते. यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रत्येक सोडतीमध्ये (लॉटरी) लाखो अर्ज येतात. त्यामुळे जास्तीत-जास्त घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार वेगवगेळ्या प्रादेशिक मंडळांत घरे बांधली जाणार आहेत.

Read This Also -MHADA E-auction for shop – आता मुंबईत स्वस्तात गाळा खरेदीची संधी, MHADA या तारखेला करणार ई-लिलाव



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.