‘म्हाडा’ची घरे २५ टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार, म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली | Mhada Lottery News

Mhada Lottery Update


Telegram Group Join Now

Mhada New Housing Prices

Mhada Lottery News: ‘म्हाडा’च्या घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्याने अर्ज करायचा की नाही. या द्विधा मनःस्थितीत असलेल्या ग्राहकांना आज राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी खुशखबर दिली आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार असल्याची घोषणा सावे यांनी केली आहे. तसेच, म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

‘म्हाडा’तर्फे निर्माण करण्यात आलेल्या ‘श्री आणि श्रीमती निवासी’ या शुभंकर चिन्हाचे (मॅस्कॉट) अनावरण गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज म्हाडा मुख्यालयात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते. ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाने नुकतीच मुंबईतील २,०३० घरांची लॉटरी जाहीर केली आहे. त्यात पुनर्विकास प्रकल्पातून ‘म्हाडा’ला खासगी विकसकांकडून मिळालेल्या घरांपैकी ३७० सदनिकांचा या सोडतीत समावेश आहे. मुंबई शहरासह उपनगरांतील या घरांच्या किमती ७० लाख ते साडेसात कोटींपर्यंत आहेत. किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे या घरांसाठी २० दिवसांत खूप कमी अर्ज आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी या घरांच्या किमती कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यानुसार सुधारित किमती मुंबई मंडळाद्वारे लवकरच ‘म्हाडा’ च्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येणार असल्याचे सावे यांनी सांगितले. खासगी विकसकांकडून मिळालेल्या ३७० घरांना हा निर्णय लागू असणार आहे.

घरांची सोडत पुढे जाणार

म्हाडाने जाहीर केलेल्या सोडतीनुसार २,०३० घरांसाठी अर्ज करण्याची ४ सप्टेंबरही अखेरची मुदत होती, तर १३ सप्टेंबरला घरांची सोडत काढली जाणार होती. आता अर्ज करण्याची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत वाढविल्यामुळे ही सोडत पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

mhada flat cost

प्रमाण (टक्के) उत्पन्न गट
25 अत्यल्प
20 अल्प
15 मध्यम
10 उच्च

 


Previous Update- २,००० घरांसाठी लवकरच सोडत, पवईतील निर्माणाधीन ४२६, तर गोरेगावमधील ३३२ घरे

Mhada Lottery News: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबईमधील म्हाडाच्या घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला सुरुवात करण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न असून मुंबई मंडळ आता सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी करीत आहे. महिन्याभरात जाहिरात प्रसिद्ध करून ऑगस्टपासून अर्ज विक्री स्वीकृतीला सुरुवात करण्याचा मंडळाचा विचार आहे. सुमारे दोन हजार घरांचा सोडतीत समावेश करण्यात येणार असून मागील सोडतीतील मुंबई शहरातील शिल्लक घरांसह गोरेगाव, दिंडोशी, मालाड, कोपरी (पवई), कन्नमवार नगर (विक्रोळी) आदी ठिकाच्या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे २०२३ ची सोडत अत्यल्प आणि अल्प गटासाठी होती. तर आगामी सोडत अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी असणार आहे. यावेळी अत्यल्प गटासाठी कमी घरे असण्याची शक्यता आहे. कोपरी, पवईतील निर्माणाधीन उच्च आणि मध्यम गटातील ४२६ आणि पहाडी गोरेगावमधील पंचतारांकित प्रकल्पातील ३३२ (मध्यम आणि उच्च) घरांचाही सोडतीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा या गटातील इच्छुकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध असणार आहे.

मुंबई मंडळातील घरांना सर्वाधिक मागणी असते. मुंबईतील घरांची २०२० ते २०२२ या काळात सोडत काढण्यात आली नव्हती. २०१९ नंतर थेट २०२३ मध्ये ४०८२ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. यावर्षीही सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार आता घरांची शोधाशोध पूर्ण करून मंडळाने त्यांच्या किंमती निश्चित करण्याच्या कामाला वेग दिला आहे. येत्या आठवड्याभरात किंमती अंतिम करून जाहिरात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

ऑगस्टमध्ये अर्ज विक्री नोंदणीला सुरुवात करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. मंडळाच्या प्रस्तावानुसार २०२४ मध्ये सुमारे दोन हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याला मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दुजोरा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सोडतीत अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठीची घरे अधिक, तर अत्यल्प गटासाठी कमी घरे असणार आहेत. ऑगस्ट २०२३ च्या सोडतीतील अंदाजे ५०० घरे शिल्लक राहिली असून या घरांचा आगामी सोडतीत समावेश करण्यात आला आहे. शिल्लक घरांसह नवीन तयार घरांची संख्या कमी असल्याने मंडळाने सोडतीतील घरांची संख्या वाढविण्यासाठी उच्च आणि मध्यम गटातील कोपरी, पवई आणि गोरेगाव, पहाडीतील निर्माणाधीन प्रकल्पांतील घरांचाही त्यात समावेश केला आहे.

पवई तलावापासून नजिक असलेल्या कोपरीमध्ये ४२६ घरांचा प्रकल्प आहे. यातील ३३३ घरे मध्यम गटातील असून ९३ घरे उच्च गटातील आहेत. तर गोरेगाव पहाडीत उच्च गटातील २२७ घरांसह मध्यम गटातील १०५ अशा एकूण ३३२ घरांचा प्रकल्प आहे. कोपरीतील प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबरमध्ये या घरांना निवासी दाखला मिळण्याची शक्यता आहे. गोरेगावमधील घरांचे ६५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून काम होऊन मार्च २०२५ मध्ये या घरांना निवासी दाखला मिळण्याची शक्यता आहे. या दोन प्रकल्पातील घरांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा मंडळाने केला आहे. सोडतीमध्ये कोपरी आणि पहाडीतील घरांसह कन्नमवार नगरमधील अल्प आणि मध्यम गटांतील घरांचा समावेश आहे. तर २०२३ मधील शिल्लक अत्यल्प आणि अल्प गटातील काही घरेही सोडतीत असणार आहेत. त्याचवेळी २०२३ मधील गोरेगावमधील पीएमएवायमधील शिल्लक ८८ घरेही सोडतीत समाविष्ट असतील. याशिवाय दिंडोशी, मालाडसह ताडदेवमधील साडेसात कोटींच्या शिल्लक घरांचाही समावेश असेल.

काही घरांची माहिती

● कोपरी, पवई – मध्यम – ३३३ -७०० ते ८००चौ. फुट – १ कोटी २५ लाख रुपये

● कोपरी, पवई – उच्च – ९३ -९८० चौ. फुट – १ कोटी ६० लाख रुपये

● कन्नमवारनगर, विक्रोळी – मध्यम गट – ८६ – ६५० चौ. फुट – ७० ते ७२ लाख रुपये

● कन्नमवारनगर, विक्रोळी – अल्प – ८६ -४७३ चौ.फुट – ४० लाख रुपये

● कन्नमवारनगर, विक्रोळी – अल्प – ८८ – ५८५ – किंमत ५० लाख रुपये

● गोरेगाव,पहाडी -मध्यम – १०५ – ७९४.३१ चौ फूट – १ कोटी ७ लाख ५ हजार रुपये

● गोरेगाव, पहाडी – उच्च – २२७ – ९७९.५८ चौ फूट – १ कोटी २५ लाख ९१ हजार रुपये

● खडकपाडा – अल्प – ८७ – ४४.६१ चौ.मी. – ६४ लाख १२ हजार ५८४ रुपये

● खडकपाडा-अल्प- ४६-५९.९१ चौ.मी.-८६ लाख ११ हजार ९२३ रुपये

● मालाड, शिवधाम-अल्प-४५-४४.२० चौ,मी. -५४ लाख ९१ हजार रुपये

● मालाड शिवधाम- अल्प-२०- ५८ चौ,मी.-७२ लाख रुपये

● मालाड शिवधाम-अल्प-२३- ५८.९३ चौ.मी.-७३ लाख २२ हजार रुपये

● मालाड शिवधाम-मध्यम-१- ६४ चौ.मी.-९० लाख ४७ हजार रुपये

● गोरेगाव, पीएमएवाय-अत्यल्प-८८-३२२ चौ.फूट-३३ लाख २००० रुपये



अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. Ajay Vijay Ahire says

    Document and required documents kya asnar tyncha vichar hota

Leave A Reply

Your email address will not be published.