विद्यार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्तीसाठी लगेच करा अर्ज ; ही आहे शेवटची तारीख | Minority Department Foreign Scholarship Apply
Minority Department Foreign Scholarship Online Apply
Minority Department Foreign Scholarship Apply: अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अंतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी 2024-2025 या शैक्षणिक वर्षात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या शिष्यवृत्तीमुळे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेशात विविध शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.
अर्ज प्रक्रिया, पात्रतेचे निकष, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आणि अन्य तपशील अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर करणे गरजेचे आहे. ही योजना अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत प्रतीवर्षी अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्याकरीता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. तसेच नजिकच्या काळात योजने अंतर्गत पालकाच्या कुटूबाच्या उत्पन्न मर्यादित तसेच जागामध्ये वाढ झाल्यास त्यानुसार जाहिरातीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे, सुधारणा करण्याचे प फेरअर्ज मागविण्याचे अधिकार शासन राखून ठेवीत आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात गेत आहेत. सदरत्ता अर्ज ऑनलाईन, पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३, चर्च रोड, पुणे- ४११००१ येथे सादर करावा.
योजनेचा उद्देश :- अल्पसंख्यांक विकास विभागाच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (गी. एच.टी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे.
योजनेच्या अटी व शर्ती :– १. विद्यार्थी हा गहाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. २. विद्यार्थ्यांना परदेशातील अद्ययावत QS World University Ranking २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला असावा ३. परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पुर्णवेळ विद्यार्थी म्हणुन प्रवेशित असावा. ४. प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना नमुद केलेल्या विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यावर बंधनकारक असेल. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मान्य केलीजाणार नाही. ५. विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पीचएडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना, पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. तसेच त्यांने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा. ६. एकाच फुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल. ७. एकदा किमान शैक्षणिक अर्हता निश्चित केल्यावर विद्यार्थ्याच्या केवळ भविष्याच्या अनुषंगाने अधिक लाभ मिळू शकेल. या दृष्टीने त्या वर्षीच्या (OS World Ranking) ची गुणवत्ता कमवारी लक्षात घेवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी बनविणे दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांची विद्यापीठाची क्रमवारी समान असल्यास अशा प्रसंगी त्यांच्या लगतच्या पदवी परिक्षेची गुणवत्ता लक्षात घेणे वयोमर्यादा :- जाहिरात प्रसिध्द झालेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेस पदव्युत्तर पदवीसाठी उमेदवारांचे वय ३५ वर्षा पेक्षा जास्त नसावे. तर पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ४० वर्षापेक्षा जास्त नसावे. (दिनांक १ ऑगस्ट, २०२४ रोजीचे वय)
उत्पन्न मर्यादा :- १. या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या/कुटूंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गानी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न रु ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे. २. विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत अथवा कुटूंबातील इतर सदस्य नोकरी करीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म नं.१६ व सक्षम प्राधिकारी (तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबांचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. ३. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी (तहसिलदार कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबांचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. ४. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रीत वार्षीक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडीलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडीलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.)
शैक्षणिक अर्हता :– १ परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५% गुणांसहित पदवी परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी. २. पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५% गुणांसहित पदव्युत्तर पदवी परिक्षा उतीर्ण केलेली असावी. ३. परदेशातील शैक्षणिक संस्थेने Offer Letter मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी संबंधीत यंत्रणेने थेट संबंधीत शैक्षणिक संस्थेस अदा करावी. ४. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उतीर्ण केलेला असावा.
अभ्यासक्रमाचा कालावधी :- १. पीएचडीसाठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो. २. पदव्युत्तर पदवी २ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो. ३. पदव्युत्तर पदवीका १ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असलेला प्रत्यक्ष कालावधी. ४. परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच MBA अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील.
List Of Documents Required For MDD Scholarship Maharashtra Yojana
सदर अर्जासोबत विद्यार्थ्याने खालील कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
(1) विहित नमून्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, (II) सक्षम प्राधिकाऱ्याऱ्यांनी दिलेला उत्पनाचा दाखला. (मागील २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा कुटूंबाचा) (III) पदवी/पदव्युत्तर पदवी परिक्षा उतीर्ण झाल्याचे पुरावे. (दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवी/पदविका यांच्या गुणपत्रांसह) (सनद/मार्कलिस्ट) (IV) परदेशातील QS World Ranking २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विनाअत (Unconditional) ऑफर लेटर. (V) ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचे सविस्तर माहिती पत्रकाची (Prospectus) प्रत. (VI) आवश्यक ते करारनामे व हमीपत्रे (VII) संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी वर्षनिहाय आवश्यक असणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक, ज्यामध्ये शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर शुल्क पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, भोजन व राहण्याचा खर्च, येण्याजाण्याचा विमान प्रवास याचा समावेश असावा. (IX) विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. (X) पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी अद्ययावत QS World Ranking ची जागतिक क्रमवारी. (XI) वेळोवेळी समाज कल्याण आयुक्तालय, पुणे तसेच शासनाने ठरवून दिलेल्या बंधपत्र/विविध दाखले तसेच अन्य कागदपत्रे सादर करणे लाभार्थ्यावर बंधनकारक राहील.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख :- ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसह सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१/१२/२०२४ असेल. वेळ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत. इतर आवश्यक बाबी- १. ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अपूर्ण भरलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. २. अर्जासोबत आवश्यक असलेली स्वसाक्षांकित कागदपत्रे न जोडल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्जावर स्वसाक्षांकित फोटो नसलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ३. ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ४. अल्पसंख्यांक विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रवर्गा व्यतिरिक्त इतर प्रवर्गाचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यांनी सबधीत कार्यालयाकडे परस्पर अर्ज करावेत. ५. QS World University Ranking २०० च्या आतील विद्यापीठाशिवाय इतर परदेशी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ६. प्रचलित अटी व शर्तीनुसार अगान्न ठरल्यास त्यांना स्वतंत्र पत्रव्यवहार करुन कळविले जाणार नाही. ७. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जामध्ये दिलेल्या अधिकृत पत्यावर कळविले जाईल जर विहीत कालावधीत त्यांनी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण न केल्यास त्याची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. ८. परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचे अंतिम अधिकार शासनास असतील.