मोफत शिलाई मशीन देणार; अफवेनेच २० हजार अर्ज, शहरातील विविध भागांतून महिलांचे लोंढे !
mofat silai machine yojana maharashtra Fake News

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. या योजनेत १८ पगड जातीच्या नागरिकांना पारंपारिक व्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी कर्जही देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले. परंतु मोफत शिलाई मशीन मिळणार ही अफवा कोणीतरी पसरवल्याने महिलांचे लोंढे महापालिकेत येत आहेत. शिलाई मशीन द्या, अशा आशयाचे तब्बल २० हजार अर्ज प्राप्त आल्याने महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीही अवाक झाले. ४०० ते ५०० रुपये खर्च करून महिला अर्ज भरत आहेत. महापालिकेच्या प्रकल्प विभागांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी केंद्र, राज्य शासनाच्या योजना याच विभागामार्फत सुरू आहेत. कोरोनानंतर हातगाडीवर साहित्य विक्रेत्यांना १० ते ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात आले. त्याच पद्धतीने ही योजना केंद्राने आणली.
शिंपी प्रवर्गात अर्ज : शिपी प्रवर्गात महापालिकेकडे २० हजार अर्ज आले आहेत. प्रत्येक अर्जावर मोफत शिलाई मशीन द्यावी, असा उल्लेख महिलांनी केला आहे. अन्य प्रवर्गात ५ हजार अर्ज आले आहेत. मुळात योजनेत शिलाई मशीन देण्याचा कुठेच उल्लेख नाही.