१८ ते ५० वयोगटातील उमेदवारांसाठी ओबीसी बिनव्याजी कर्ज योजना | MSOBCFDC Karj Yojana Form

OBC Karj Yojana Application


Telegram Group Join Now

MSOBCFDC Karj Yojana Form PDF

MSOBCFDC Karj Yojana Form: इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे राज्यातील इतर मागासवर्गीय नागरिकांना स्वयंरोजगार व उच्च शिक्षणासाठी अल्पदराने किंवा बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेची महत्तम प्रकल्प मर्यादा पाच लाख रुपये आहे. यात महामंडळाचा सहभाग २० टक्के, लाभार्थ्यांचा सहभाग पाच टक्के व बँकेचा सहभाग ७५ टक्के आहे. १८ ते ५० वयोगटातील उमेदवारांना याचा लाभ मिळणार आहे

Age Limit For OBC Karj Yojana

अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असावे.

Eligibility Criteria For Maharashtra OBC Loan Scheme

या योजनांतून शेतीपूरक किंवा इतर छोट्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. नियमित कर्ज परतफेड केल्यास व्याज आकारले जात नाही. थकीत हफ्त्यानंतर वार्षिक चार टक्के व्याजदर आकारला जातो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपर्यंत असावे, यासाठी अर्जदाराचे क्य १८ ते ५५ पर्यंत असावे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनाही राबविण्यात येत आहे.

How To Apply For OBJ Karj Yojana 2024

यात गरजू व कुशल उमेदवारांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठीही राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमार्फत ही योजना राबविली जाते. बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळ १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा म्हणून अनुदान स्वरूपात लाभार्थ्याला देते. कर्जासाठी महामंडळाच्या msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज करावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असावे.

महिलांनाही लाभ – OBC Karj Yojana Mahila Labharthi 

इतर मागासवर्गातील होतकरू व गरीब महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यातील बचत गटांत उत्पादित वस्तूंचे प्रक्रिया व मूल्य संवर्धन उद्योगांसाठी बँकेने दिलेल्या पाच ते १० लाखांपर्यंतच्या कर्ज रकमेवर महामंडळ १२ टक्के व्याज परतावा देते. ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून लोकसंचालित साधन केंद्राच्या साहाय्याने राबविली जाते.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रु.१०.०० लक्ष पर्यंतची कर्ज योजना

तपशिल :-

  • महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन,व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र, इ. व्यवसायाकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे.
  • महामंडळाच्या पोर्टलवर नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य.
  • बँकेमार्फत लाभार्थीना रुपये १०.०० लक्ष पर्यंत कर्ज वितरित केले जाईल. कर्ज रक्कमेचे हफ्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादेत ) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रामाणिकरणानुसार लाभार्थींच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
  • लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत.
  • अर्जदाराचे वय १८ ते ५० असावे.
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ८.०० लक्ष पर्यंत.

Documents Required For Maharashtra State OBC Loan Scheme

सदर योजनेकरीता लागणारी कागदपत्रे (अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे)
१) जातीचा दाखला (Cast Certificate)
२) उत्पन्नाचा दाखला कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. १,०००००/-
३) आधार कार्ड
४) CIBIL Credit Score Report (सिबील स्कोर ५०० पेक्षा जास्त असावा)
५) PAN Card
६) DOMICLE CERTIFICATE
७) शिदा पत्रिका (रेशन कार्ड)
८) दरपत्र (GST चे कोटेशन अनिवार्य)
९) प्रकल्प अहवाल (Project Report)
१०) Bank Pass Book Xerox (आधार लिंक)
११) व्यवसायाकरीता लागणारे ना हरकत प्रमाणपत्र (नगरपालीका, ग्रामपंचायत नगर पंचायत) १२) व्यवसाय स्थळाचा जागेचा पुरावा (टॅक्स पावती, भाडे पावती, १००रु. पेपरवर करारनामा / संमतीपत्र)
१३) शाळा सोडण्याचा दाखला (School Leaving Certificate)
१४) तांत्रिक व्यवसायाकरीता प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला
१६) २ पासपोर्ट साईझ फोटो
१८) जामीनदारांची कागदपत्रे
अ) १ राज्य शासनाचे कर्मचारी जामीनदार (भंडारा जिल्ह्यात कार्यरत, ज्यांची सेवा कमीत कमी ८ वर्षे शिल्लक असणे आवश्यक) असल्यास वेतन प्रमाणपत्र, संमतीपत्रासहीत, कार्यालयाचे ओळखपत्र, आधारकार्ड (सहकार क्षेत्र, अनुदानित संस्था/शाळा, केंद्र शासनाचे कर्मचारी, वगळून)
किंवा

ब) शेत जमीनीचा ७/१२ उतारा, जामीनदारचे संपतीपत्रासह, आधार कार्ड टिप : कर्ज मंजुरीनंतर महामंडळाच्या नियमानुसार वैधानिक कागदपत्र पूर्ण करावी लागतील.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.