मुद्रांक शुल्क अभय योजनेला मुदतवाढ – ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार
Mudrank abhay Yojana Update
Mudrank abhay Yojana – मुद्रांक शुल्क अभय योजनेला मुदतवाढ वाढती मागणी लक्षात घेऊन १९८० ते २०२० या कालवधीत सदनिका घेतली असेल. परंतु मुद्रांक शुल्क कमी भरले असेल; अथवा १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्री करारनामा केला, मात्र रजिस्टा करण्यासाठी दाखल केले नाही अथवा बाजारभाव विचारात न घेता दस्तामध्ये जी रक्कम दाखविली, त्या रकमेवरच मुद्रांक शुल्क भरले असेल, तर अशा नागरिकांसाठी राज्य सरकारने ही ‘अभय’ योजना जाहीर केली होती.
त्यामध्ये १ जानेवारी १९८० ते ३१ अभय योजना मुदतवाढ डिसेबर २००० या कालावधीसाठी आणि १ जानेवारी २००१ ते २०२० या कालावधीतील दस्तांसाठी असे दोन गट तयार करण्यात आले होते. १ डिसेंबरपासून ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अशा दोन टप्प्यांत हो योजना जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील योजनेला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तर दुसन्या टप्यातील योजनेत अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मध्यंतरी त्यामध्ये याद करोत राज्य सरकारने ती मुदत ३० जूनपर्यंत आणि त्यांनतर ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. नुकतीय ती मुदत संक्ली. आता पुन्हा या योजनेस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सह जिल्हानिबंधक संतोष हिगाणे यांनी सांगितले.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या योजनेची अंमलबजावणी राज्यभरात सुरू केली आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या दस्तासाठी सह जिल्हा निबंधक कार्यालय येथे अर्ज करता येतील, शिवाय नोंदणीस सादर दस्तांबाबत त्या त्या सब रजिस्टर कार्यालयात अर्ज करता येतील. तर पिंपरी-चिंचवडमध्ये दापोडी येथील सिद्धी टॉवर, एक विंग, पहिला मजला वरील हवेली क्रमांक १७ आणि २५ येथे विशेष कक्षात अर्ज करता येणार आहे. १९८० ते २००० आणि २००१- २०२० या कालावधीतील दस्तांसाठी दुसऱ्या टप्प्यात मुद्रांक शुल्कावर १०० ऐवजी ५० टक्के सवलत मिळणार आहे. तर या कालावधीतील दस्तांवर असलेल्या दंडात २० टक्केच सवलत मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील योजनेत १०० टक्के सवलत होती. ती आता दुसऱ्या टप्प्यात कमी झाली आहे.