लाडक्या भावांसाठी जाहीर योजनेचे पैसे किती महिने मिळणार, पूर्ण माहिती GR प्रकाशीत, अर्ज कसा कराल..
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
Table of Contents
मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna) सुरु केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारला या निर्णयानंतर लाडक्या भावांचं काय असा प्रश्न विचारला जात होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये लाडकी बहीण योजनेप्रमाणं लाडक्या भावांसाठी देखील योजना राबवल्याचं म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी योजना राबवल्याचं म्हटलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांसाठी (Ladka Bhau Yojana) ज्या योजनेची माहिती सांगितली ती नेमकी कशाची होती? बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना 8 हजार आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना 10 देणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. ही माहिती लाडका भाऊ योजनेची होती का? याबाबतची माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आज १७ जुलै २०२४ रोजी या योजनेचा नवीन GR म्हणजेच परिपत्रक जाहीर झालं आहे. यात या योजने बद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे. चला तर जाणून घेऊ या पूर्ण अपडेट्स आणि अर्ज प्रक्रिया बद्दल पूर्ण माहिती.
काय आहे नवीन GR ?
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय?Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकाचं काम योग्य वाटल्यास त्यांना तिथं नोकरी देऊ शकतात. याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्या वेतनाशिवाय अधिकची रक्कम संंबंधित आस्थापना युवकांना देऊ शकतात. युवकांना राज्य सरकारकडून देण्यात येणारा स्टायपेंड दरमहा दिला जाणार आहे. हा स्टायपेंड सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पात्रता? Eligibility For CM Yuva Prashikshan Yojana
- योजनेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
- उमेदवार बारावी उत्तीर्ण/आयटीआय /पदविका/ पदवी आणि पदव्युत्तर असावा.
- शिक्षण चालू असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- आधार नोंदणी असावी, बँक खाते आधार संलग्न असावे
- इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधित उद्योगाकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.