Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



दिव्यांग खेळाडूंना मिळणार ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य !! Nagpur Mahapalika Divyang Arth Sahay Yojana


Telegram Group Join Now

Nagpur Mahapalika Divyang Arth Sahay Yojana : महापालिकेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्य दाखविणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना विविध स्तरावर आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. या खेळाडूंना क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपयांपर्यंत कमाल आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात समाज विकास विभागातर्फे विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.

Empower differently-abled athletes with financial aid for sports equipment, training, and competition expenses. Apply online for up to ₹3 lakh support through the Nagpur Municipal Corporation for national and international para sports. Explore inclusive sports funding and government assistance for disabled athletes.

शहरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण, खेळासाठी आवश्यक क्रीडा साहित्य, स्पर्धासाठी येण्या-जाण्याचा खर्चाची तरतूद आदीचा लाभ घेण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांकडून महापालिकेने अर्ज मागविले आहे. मनपाच्या संकेत स्थळावर www.nmcnagpur.gov.in ऑनलाइन पद्धतीने दिव्यांग लाभार्थी (Divyang Arth Sahay Yojana) या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

financial aid for disabled athletes

राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र होणाऱ्या खेळाडूंना प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादीसाठी १५ हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र होणाऱ्या खेळाडूंना प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादीसाठी २५ हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र होणाऱ्या खेळाडूंना प्रवास खर्च,प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादीसाठी १ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. हे अर्थसाहाय्य क्रीडा प्रकार व स्पर्धा आयोजनाचे ठिकाणावर अवलंबून राहील, असे महापालिकेच्या समाज विकास विभागाने स्पष्ट केले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, यूथ ऑलम्पिक, ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई, जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धांसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना ३ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या स्पर्धांसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना देश-विदेशातील प्रशिक्षण, मार्गदर्शन व क्रीडा साहित्य आयात करणे वा खरेदी करण्याकरिता हे अनुदान दिले जाणार असल्याचे उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी कळविले आहे.

Divyang Kheladu Arthik Sahayak Yojana

  • क्रीडा साहित्य खरेदीसाठी दिव्यांग खेळाडूंना कमाल ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते.

  • राज्यस्तरीय स्पर्धा: पात्र खेळाडूंना प्रवास, प्रवेश शुल्क, निवास, भोजन यासाठी १५,००० रुपये अर्थसहाय्य मिळेल.

  • राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा: खेळाडूंना यात २५,००० रुपये अर्थसहाय्य दिले जाईल.

  • आंतरराष्ट्रीय स्पर्धा: पात्र खेळाडूंना १ लाख रुपयांचे सहाय्य मिळेल.

  • अधिक प्रमुख स्पर्धा (ऑलिम्पिक्स, जागतिक अजिंक्यपद, एशियन गेम्स, राष्ट्रकुल, पॅरा ऑलिम्पिक, इ.): यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना देश-विदेशातील प्रशिक्षण, मार्गदर्शन, क्रीडा साहित्य आयात किंवा खरेदी यासाठी ३ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.