सरळ नोकरी,पदवीधरांना सरकारच्या वीमा कंपनीत नोकरी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार!
जर आपण पदवीधर आहात आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण तुम्हाला चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळण्याची संधी चालून आली आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. हि नवीन जाहिरात आताच प्रकाशित झाली असून पूर्ण माहिती आणि अर्ज पद्धती आम्ही येथे दिली आहे. सोबतच जाहिरात PDF लिंक आणि अर्जाची लिंक सुद्धा दिलेली आहे.
तर मित्रांनो, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) मध्ये सहाय्यक पदाची भरती करण्यात येत आहे या संदर्भातील हि जाहिरात प्रकाशित झाली आहे. अधिकृत वेबसाइट newindia.co.in वर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये असिस्टंटच्या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवाराने ज्या ठिकाणासाठी अर्ज केला आहे त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांदरम्यान असावे. असे असले तरी राखीव श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल. असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. उमेदवारांची निवड ही पूर्वपरीक्षा,मुख्य परीक्षा, प्रादेशिक भाषा परीक्षा याआधारे होणार आहे.
एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून 100 रुपये सूचना शुल्क आकारण्यात येणार आहे. इतर श्रेणीतील उमेदवारांकडून 850 रुपये शुल्क आणि सूचना शुल्क आकारण्यात येईल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे त्याचे आधार कार्ड, पोस्ट संबंधित पदवी आणि डिप्लोमा, पासपोर्ट आकाराचा फोटो, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, कायम रहिवासी प्रमाणपत्र, स्वाक्षरी, पत्त्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट newindia.co.in वर जा. यानंतर Apply Online वर क्लिक करा. सर्व तपशील प्रविष्ट भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. नोंदणी करा आणि शुल्क भरा. आता फॉर्म सबमिट करा. फॉर्मची प्रिंट आऊट घेऊन ठेवा. सीईएल भरती अंतर्गत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट आणि तंत्रज्ञची रिक्त पदे भरली जाणार आहेत. अधिकृत वेबसाइट www.celindia.co.in वर याची अर्ज प्रक्रिया सुरु आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भारत सरकारच्या डिपार्टेंट ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्चच्या अंतर्गत येते. या विभागाला वेगवेगळ्या ग्रेड्ससाठी ज्युनिअर असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट आणि टेक्निशियन्सची गरज आहे. याचा सविस्तर तपशील पुढे देण्यात आलाय. या पदांवर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्व्हिसमन यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार आहे. इतर इतरांसाठी 1 हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करु शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूवर्क वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.