१०वी पास ते पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; निती आयोगात भरती सुरु – Niti Aayog Bharti 2025
Niti Aayog Bharti 2025
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. निती आयोगात नोकरीची सुवर्णसंधी आहे. निती आयोगात स्टाफ कार ड्रायव्हर, कुक, डायरेक्टर जनरल पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या चांगल्या विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. १०वी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. (NITI Aayog Recruitment)
प्रोटोकॉल ऑफिसर भरतीसाठी अर्ज करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. स्टाफ ड्रायव्हर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२५ आहे. असिस्टंट कुक पदासाठी २६ जानेवारी २०२५, डायरेक्टर जनरल पदासाठी १८ फेब्रुवारी २०२५ आणि प्रोटोकॉल ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीक १२ फेब्रुवारी २०२५ आहे. (Niti Aayog Recruitment 2025)नीती आयोगातील स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास केलेली असावी. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवे.कुक पदासाठी कॅटरिंग डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा. डीजी पदासाठी इकोनॉमिक्स/ सोशियोलॉजी / ह्युमॅनिटीज / ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये मास्टर्स डिग्री केलेली असावी.प्रोटोकॉल ऑफिसर पदासाठी बॅचलर डिग्री केलेली असावी.
या नोकरीबाबत तुम्हाला सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे.