आता टीव्ही पाहण्यास दोन वर्षांखालील मुलांना बंदी, नवीन मार्गदर्शन तत्वे जाहीर!
No TV or screens for toddlers!
आपल्याला माहीतच आहे , आपल्या भारतामध्ये एक वर्षाचे लहान मूल रडायला लागले तरी त्याला शांत करण्यासाठी त्याच्या हातात मोबाइल दिला जातो. सर्वीकडे आजूबाजूला हे चित्र दृष्टीस पडत. पण दुसरीकडे, विकसित देश असलेल्या स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल किंवा टीव्ही पाहण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे. तिथल्या सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या मते, स्क्रीनचा वापर लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. म्हणूनच, तिथे लहान मुलांना डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजनपासून पूर्णपणे दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हे फक्त लहान मुलांसाठीच नाही, तर इतर वयोगटांमध्येही स्क्रीन टाइम नियंत्रित करण्याची गरज सरकारने ओळखली आहे. पण दुर्दैवाने, आपल्या देशात अजूनही या गोष्टींकडे पुरेशे लक्ष दिले जात नाही.
मार्गदर्शक तत्त्वे काय?
- दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्हीपासून दूर ठेवावे.
- दोन ते पाच वयोगटातील मुलांना दररोज एक तासापेक्षा जास्त स्क्रीन पाहण्यास देऊ नये.
- सहा ते बारा वयोगटातील मुलांचा स्क्रीन टाइम दररोज एक ते दोन तासांपर्यंत मर्यादित असावा.
- तेरा ते अठरा वयोगटातील मुलांनी दोन ते तीन तासांपेक्षा जास्त स्क्रीन वापरता कामा नये.
स्वीडन येथील Mr. Forssmed यांनी सांगितले की, यामुळे “सामाजिक उपक्रम, शारीरिक क्रियाकलाप किंवा पुरेशी झोप यासाठी फारसा वेळ उरत नाही,” आणि स्वीडनमध्ये झोपेची समस्या गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले, कारण १५ वर्षांच्या वयाच्या पेक्षा जास्त मुलांपैकी निम्म्याहून अधिक मुलांना पुरेशी झोप मिळत नाही. या सर्व कारणामुळे लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणे आवश्यक आहे. आन भारतात सुद्धा या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.