अर्ज कसा करायचा ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मोफत तीर्थदर्शन योजना – Mukhyamantri Teerth Darshan Yojana How to Apply

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Online Application Form


Telegram Group Join Now

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शना’साठी अर्ज प्रक्रिया सुरू

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Online Application Form: सर्व धर्मातील ६० वर्षांवरील व्यक्तीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत असलेल्या या योजनेसाठी समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात असल्याचे देवीदास नांदगावकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडविले जाते. जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तीला निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी या योजनेचा लाभ एकावेळी घेता येईल. यात प्रत्यक्ष प्रवास, भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये इतकी असून, हा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जाणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ नाशिक या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Chief Minister Eknath Shinde announced in the Legislative Assembly on Saturday that the Chief Minister’s Pilgrim Visit Scheme will be started for senior citizens of the state to visit pilgrimage sites. The Chief Minister also said on this occasion that by preparing policies and regulations for this scheme, the senior citizens will be taken to visit the pilgrimage sites through the state government.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Online Application Form – राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना राज्य सरकारच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा .

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेत आमदार राम कदम, प्रकाश सुर्वे, देवयानी फरांदे, मनीषा चौधरी यांनीही तीर्थदर्शन योजनेची मागणी केली. समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांचाही या योजनेत समावेश करण्याची मागणी केली. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून दरवर्षी अनेकजण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. Mukhyamantri Teerth Darshan Yojana Online Application Form Details 2024.

Who is Eligible For Mukhyamantri Teerth Darshan Yojana – ‘तीर्थस्थळ दर्शन’योजनेसाठी कोण ठरणार पात्र ?

योजनेची घोषणा करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी रोटेशन पद्धतीने नागरिकांना तीर्थाटनाला नेण्याचे सूतोवाच केले. विविध पक्षीय आमदार हे आपापल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना धार्मिक पर्यटनाला नेतात. त्यामुळे सरकार स्वतः नागरिकांना तीर्थस्थळी नेणार की या आमदारांच्या माध्यमातून योजना राबविली जाणार, याबाबत साशंकता आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.