शेतकऱ्यांनो मोबाईल नंबर चुकीचा टाकला, तर लगेच करा अपडेट, नाहीतर मिळणार नाही निधी! – PM Kisan Update Mobile Number

PM Kisan Update Mobile Number


Telegram Group Join Now

PM Kisan Update Mobile Number

केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी तर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी बारा हजार रुपयांचा निधी मिळतो. योजनेत सहभागी होण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांना आपला भ्रमणध्वनी क्रमांक टाकावा लागतो. मात्र, नागपूर विभागात येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील सहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक चुकीचे टाकले. एकच क्रमांक अनेक शेतकऱ्यांच्या नावे नोंदविण्यात आला.

PM Kisan Update Mobile Number

नागपूर विभागातील सहा हजारांवर शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक चुकीचे

या साऱ्या प्रकारामुळे कृषी विभागाची डोकेदुखी वाढली आहे. वारंवार माहिती मागविल्यानंतरही शेतकरी आपले संपर्क क्रमांक देण्यास मागेपुढे बघत असल्याचे चित्र दिसून येत आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने २०१८ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अनुदान मिळते. हे अनुदान त्यांच्या खात्यावरच जमा केले जाते. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारनेही शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त लाभ म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजनाही दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आली.

पोएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासनातर्फे वर्षांला अतिरिक्त सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनातर्फे वार्षिक सहा हजार रुपये आणि राज्य शासनातर्फे वार्षिक सहा हजार असे एकूण बारा हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. दर चार महिन्यांच्या अंतराने केंद्र शासनातर्फे दोन हजार आणि राज्य शासनाकडून दोन हजार असे चार हजार रुपये मिळतात. पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी, लँड सिडींग आवश्यक आहे. बँक खात्याला आधार जोडणी गरजेचे आहे. या बाबी परिपूर्ण नसल्यास शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांपासून मुकावे लागते. पीएम किसान पोर्टलवर योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते.

नोंदणी करताना नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी चुकीचे मोबाईल क्रमांक टाकले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या नावे एकाच मोबाईल नोंदविण्यात आल्याचे दिसून येत आहे. मोबाईल क्रमांकच चुकीचे असल्याने अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संबंधित कोणतेही संदेश प्राप्त होत नाही, अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित गावातील कृषी सहायकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असतानाही शेतकरी आपले मोबाईल क्रमांक दुरुस्त करण्यास मागेपुढे बघत असल्याचे चित्र आहे.

Update PM Kisan Mobile Number

चुकीच्या, डुप्लिकेट मोबाईल क्रमांकाच्या दुरुस्तीसाठी केंद्र शासनातर्फे पीएम किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नरमध्ये अपडेटेट मोबाईल क्रमांक ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाईल चुकीचे टाकलेल्या शेतकऱ्यांनी या सुविधेचा उपयोग करून ३१ ऑगस्टपूर्वी त्यांचे पीएम किसान खात्यातील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घ्यावे. – शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग

Click Here To Update PM Kisan Mobile Number Online


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.