Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी पोहोचले पाच लाखांवर, तुम्ही लाभ घेतला का?

PM Kisan Yojana New Update


Telegram Group Join Now

पंतप्रधान किसान सन्मान योजना (पीएम किसान PM Kisan Yojana New Update) हस्तांतरानंतर जिल्हा अधीक्षक कृषी खात्याने एक लाख ३६ हजार शेतकऱ्यांच्या पेंडिंग ई-केवायसी मार्गी लावल्या आहेत. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाच लाख ९ हजारांपर्यंत पोहोचली आहे. केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात केंद्र शासनाचे सहा हजार रुपये थेट जमा केले जातात. शेतकऱ्यांसाठीची ही योजना अगोदर महसूल खात्याकडे होती. शेतकऱ्यांशी निगडित पीएम किसान योजना राबविताना अडचणी येऊ लागल्या.

त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी महसूल व कृषी विभागात काही महिने वाद होता. शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी जास्तीत जास्त कृषी खात्याकडे असल्याने ही योजना महसूल खात्याकडून एक फेब्रुवारी २०१९ पासून जिल्हा अधीक्षक कृषी खात्याकडे वर्ग करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे योजना हस्तांतर करताना एक लाख ४० हजार ९७ ई-केवायसी पेंडिंग होती. योजना हस्तांतरानंतर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय अंकित सर्वच तालुका कृषी कार्यालयांनी एक लाख ३५ हजार ४९८ शेतकऱ्यांच्या पेंडिंग असलेल्या ई- केवायसी पूर्ण केल्या आहेत.

जिल्ह्यात नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाच लाख ८ हजार ९२० इतकी असून, त्यापैकी पाच लाख चार हजार २८१ ई-केवायसी पूर्ण झाल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण आलेल्यांपैकी चार लाख ९८ हजार ५९१ शेतकऱ्यांचे आधार कार्ड बैंकेत लिंक झाली आहेत. साडेचार हजार खाती ई- केवायसी पेंडिंग आहेत तर साडेसहा हजार खाती आधार लिंकसाठी पेंडिंग आहेत.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.