Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ₹१५,००० अर्थसहाय्य योजना | PMC Maulana Abdul Kalam Azad Yojana

PMC Maulana Abdul Kalam Azad Arth Sahay Yojana


Telegram Group Join Now

इ. १० उत्तीर्ण विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य – मौलाना अबुल कलाम आझाद

१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ₹१५,००० अर्थसहाय्य योजना

ही योजना १० वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ₹१५,००० पर्यंत अर्थसहाय्य प्रदान करते. पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी ही मदत मिळविण्यासाठी अर्ज करावा लागेल. या योजनेचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना मिळविण्याची संधी आहे. तरीही सर्व पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात.

पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे

    1. पात्रता निकष:
      • खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संबंधित शैक्षणिक वर्षात किमान ८०% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
      • मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी किंवा PMC किंवा रात्रीच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत किमान ७०% गुण मिळवणे आवश्यक आहे.
    2. आवश्यक कागदपत्रे:· रेशनिंग कार्ड:- अपत्याच्या पडताळणीसाठी रेशनिंग कार्डची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे. (रेशनिंग कार्डच्या पहिल्या व नावांच्या पानाची स्कॅन कॉपी जोडणे आवश्यक आहे.)
      · वास्तव्याचा पुरावा (पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे):
      मागील ३ वर्षांचा मनपा कर पावती.
      लाईट बिल.
      लँडलाइन टेलिफोन बिल.
      झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती /
      भाडे करारनामा या पैकी एकाची मूळ प्रत स्कॅन
      करून जोडणे आवश्यक आहे.
      · आधार कार्ड आणि बँक पासबुक :- आधार कार्ड व बँक पासबुक एकमेकांना संलग्न करून त्यांची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
    3. आधार कार्ड आणि बँक पासबुक :- आधार कार्ड व बँक पासबुक एकमेकांना संलग्न करून त्यांची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
      · वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला/ससून रुग्णालयाचा जन्माचा दाखला, शाळेचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र इ.पैकी एकाची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
      · मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
      · बोर्ड मार्कशीट: इ.१० वी ची बोर्ड मार्कशीटची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
      · CBSE किंवा ICSE शाळांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्रावर शाळेचा शिक्का व शाळा प्रमुखाचा सही व शिक्का घेऊन स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
      · पुणे महानगरपालिकेच्या शाळेत किंवा रात्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तेच निकष लागू होतील.
  1. महाविद्यालय प्रवेश शुल्क आणि प्रवेश पत्र:
    • महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती आणि प्रवेश पत्र जोडावे.
    • महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीतील सर्व रकाने भरणे आवश्यक आहे.
  2. अधिक शर्ती:
    • ०१/०५/२००१ नंतर जन्मलेली आणि कुटुंबात दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
    • १० वी नंतर शासकीय मान्यताप्राप्त किंवा विद्यापीठ मान्य संस्थेत प्रवेश घेतल्यास शैक्षणिक सहाय्य मिळेल.
    • प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला एका आर्थिक वर्षातच लाभ दिला जाईल.
  3. महत्वाचे नोट्स:
    • मूळ कागदपत्रांची स्कॅन कॉपी जोडावी (झेरॉक्स कॉपी स्वीकारली जाणार नाही).
    • अर्जदारांच्या पात्रतेचे पुनरावलोकन उपलब्ध निधीच्या आधारावर केले जाईल आणि निर्णय मुख्य समाज विकास अधिकारी, पुणे महानगरपालिका यांच्या कडून घेतले जातील. त्यांचा निर्णय अंतिम ठरेल


अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.