महत्वाचे! – रेशनकार्डला मोबाईल लिंक केला आहे का ? KYC करणेही आवश्यक, पूर्ण माहिती!
Ration Card Mobile Link
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्याचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने रेशनकार्डधारकांचे मोबाइल क्रमांक रेशनकार्डला लिंक करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागाने हाती घेतले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार ४२७ रेशनकार्डधारकांचे मोबाइल लिंक झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख ८७ हजार ८७० रेशनकार्डधारकांना स्वस्त दुकानदारांमार्फत धान्य वितरित केले जाते. यात वेळोवेळी शासनाने दिलेल्या योजनांमधून धान्याचा लाभ दिला जातो. धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता यावी, तसेच योजनेपासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता जिल्हा पुरवठा विभागाकडून ई-पॉस मशीनच्या माध्यमातून ठसे घेतल्यानंतरच धान्य देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर गौरी-गणपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधाही वितरित केला जातो. दरम्यान, या धान्य वितरण प्रणालित आणखी पारदर्शकता यावी, याकरिता रेशनकार्डधारकांचे मोबाइल, आधार लिंक करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ८७ हजार ८७० रेशनकार्डधारकांपैकी ५६ टक्के लाभार्थ्यांचे मोबाइल लिंक करण्यात आले आहेत.
मोबाइल लिंक करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. २ लाख ८७ हजार ८७० कार्डधारकांपैकी १ लाख ६१ हजार ४२७ कार्डधारकांचे मोबाइल लिंक झाल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात नऊ तालुक्यांत २ लाख ८७ हजार ८७० रेशन लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरित केला जातो. जिल्हा पुरवठा विभागाकडून लाभाथ्यांचे मोबाइल रेशनकार्डशी लिक करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५६ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित लवकरच पूर्ण होईल.