Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक, गुंतवणूकदारांसाठी तीन प्रमुख घोषणा

RBI Latest 2024 Scheme


Telegram Group Join Now

सरकारी रोखे (जी-सेक) खरेदी किरकोळ गुंतवणूकदारांना सुलभ व्हावी यासाठी मोबाइल ॲप लवकरच सुरू करण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी केली. वैयक्तिक गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि गिल्ट खाती राखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०२१ मध्ये ‘आरबीआय रिटले डिरेक्ट’ हे विशेष पोर्टल सुरू केले. आता ही रोखे खरेदी-विक्री अधिक सोयीस्कर अशा ॲपद्वारे गुंतवणूकदारांना करता येईल.

 यूपीआय प्रणालीची लोकप्रियता आणि स्वीकृती पाहता, तसेच एटीएममध्ये कार्डाविना पैसे काढण्यासाठी यूूपीआयच्या वापराचे दिसणारे फायदे पाहता, आता यूपीआयच्या वापराद्वारे रोख जमा करण्याची सुविधा लवकरच मध्यवर्ती बँकेकडून सुकर केली जाईल. बँकेच्या शाखांवरील रोख हाताळणीचा भार कमी करण्यासह, ग्राहकांसाठीही सोयीस्कर ‘कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम)’ बँकांनी तैनात केली आहेत. यावर रोख जमा करण्याची सुविधा सध्या फक्त डेबीट कार्ड वापरून शक्य आहे, ती लवकरच कार्डाविना यूपीआयद्वारे शक्य बनेल.

रिझर्व्ह बँकेने ई-रूपी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) वॉलेट्सच्या व्यापकरित्या वापरास प्रोत्साहन म्हणून त्यात ‘नॉन-बँक पेमेंट सिस्टम ऑपरेटर’ना परवानगी देण्याची घोषणा केली. आजवर काही ठरावीक बँकांपुरती मर्यादित असलेली सीबीडीसी वॉलेट्सच्या वितरणास बँकेतर वित्तीय कंपन्यांनाही मुभा असेल.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.