Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


ई-श्रम पोर्टलवर नोंदणी कशी करायची ?? गिग कामगारांना संरक्षण, त्वरित करा नोंदणी । Registration Process For Eshram

Registration Process For Eshram In Marathi


Telegram Group Join Now

Registration Process For Eshram 2025

Registration Process For Eshram: सध्याच्या काळात असंघटित कामगारांसाठी विविध योजना अस्तित्वात आहेत, आणि त्याचबरोबर गिग कामगारांची संख्या देखील वाढत आहे. गिग कामगार हे हे स्वयंरोजगार करणारे, वेळेवर काम करणारे व करारावर काम करणारे असतात, आणि हे क्षेत्र अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये गिग कामगारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या वाढत्या कामगारांची मदत करण्यासाठी, केंद्र सरकारने एक विशेष पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून गिग कामगारांना सोयीसुविधा, संरक्षण व विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवता येणार आहे.

👉ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी आवश्यक डॉक्यूमेंट

या संदर्भात, सहाय्यक कामगार आयुक्त श्री. नि. वा. नगरारे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे गिग कामगारांना केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या पोर्टलवर नावनोंदणी करून, गिग कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवता येईल. जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार विभाग यांनीही या बाबतीत पुढाकार घेतला असून, संबंधित गिग कामगारांना अधिकाधिक सहभागी होण्याचे प्रोत्साहन दिले आहे.

Eshram Nondani 2025

या नावनोंदणी (Eshram Nondani 2025) प्रक्रियेत गिग कामगारांना त्यांच्या ओळखपत्राची, बँक खात्याची व इतर आवश्यक माहिती देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना हक्क असलेल्या योजनांचा लाभ मिळवता येईल. यामुळे गिग कामगारांना त्यांच्या कामाच्या परिस्थितीला योग्य आर्थिक व सामाजिक संरक्षण मिळेल.

गेल्या काही वर्षांमध्ये ओला, उबेर, झोमॅटो, स्विग्गी अशा प्लॅटफॉर्म आधारित व्यवसायांनी भारतासह जागतिक पातळीवर रोजगारनिर्मितीचे मोठे साधन तयार केले आहे. या प्लॅटफॉर्म्सवर काम करणारे लाखो गिग कामगार आपल्या कामकाजी जीवनाचा भाग म्हणून कार्यरत आहेत. तथापि, या कामगारांना सुरक्षित भविष्यासाठी संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाने विशेष नोंदणी उपक्रम हाती घेतला आहे.

गिग कामगार म्हणजेच त्या कामगारांना, जे वेळोवेळी काम करणारे असतात आणि ज्यांचे कार्य ठराविक ठिकाणी व ठराविक वेळेस असते. यामध्ये ओला, उबेर, झोमॅटो, स्विग्गी अशा अ‍ॅप-आधारित सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांशी संबंधित कामगारांचा समावेश होतो. या कामगारांना त्यांच्या कामाशी संबंधित पेंशन, विमा, आणि अन्य सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-श्रम पोर्टल’ तयार केले आहे.

How To Register On E shram Portal 2025 – register.eshram.gov.in

How To Register On E shram Portal 2025: ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या आशा कामगारांना विधिध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे झोमॅटो, स्वीगी, ओला, उबेर यासारख्या प्लॅटफॉर्मवर काम करण्याऱ्या डिलिव्हरी बॉय, राइडर, ड्रायव्हर आणि इतर गिग कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अशा गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. पात्र गिग कामगारांनी http://register.eshram.gov.in/#/user/platform-worker-registration  या अधिकृत लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे फायदे

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास नोंदणीधारकास विविध सामाजिक सुरक्षा योजना आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. या नोंदणीद्वारे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना औपचारिक ओळख मिळेल. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.