Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Anudaan Arj – मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य योजना, २६ सप्टेंबरपर्यंत स्वीकारणार अर्ज

mahamesh Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Yojana


Telegram Group Join Now

Table of Contents

Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Anudaan Arj

Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Anudaan Arj: Punyaslok Ahilya Devi Maharashtra Sheep and Goat Development Corporation for the nomadic tribe-C category of Sindhudurg district under the state level scheme for the beneficiaries of Dhangar and similar tribes under the state level scheme for the purchase of semi-enclosed, enclosed medi farming land for the landless shepherd families in the form of grant in the form of a one-time lump sum financial assistance scheme on the website www.mahamesh.org till 26th September. District Animal Husbandry Deputy Commissioner Dr. K. N. Khare has done it. Under this state-level scheme, for the landless Maitrapal family to purchase at least 1 bunch of land for semi-enclosed, closed mehopalan, 75 percent of the cost of the land or 75 percent of the amount to be paid as rent for taking the rent contract for Kisan 30 Ks, a maximum of Rs. For more information please contact Livestock Development Officer, Panchayat Committee concerned with extension, District Animal Husbandry Officer, Zilla Parishad Sindhudurg and District Animal Husbandry Usayukt, District Sindhudurg. Know more about Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Anudaan Arj, mahamesh Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Yojana at below:

Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Anudaan Arj: पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमातीमधील लाभाथीसाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेडीपालन करण्याकरिता जागा खरेदीसाठी अनुदान स्वरुपात एक वेळचे एकरकमी अर्थसहाय योजनेकरिता लाभार्थीनी www.mahamesh.org या संकेतस्थळावर २६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्ह्य पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. के. एन. खरे यांनी केले आहे. या राज्यस्तरीय योजनेअंतर्गत भूमिहीन मैत्रपाल कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेहोपालन करण्याकरिता किमान १ गुंठा जागा खरेदी करण्यासाठी, जागेच्या किमतीच्या ७५ टक्के अथवा किसान तीस क्यांसाठी भाडे करारावर घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या ७५ टक्के रक्कम एक वेळचे एकरकमी अर्थसहाय म्हणून कमाल ५० हजार रुपये अनुदान वाटप करण्यात येते. अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी, विस्तार संबंधित पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन उस्आयुक्त, जिल्हा  सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.

भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील भूमीहीन मेंढपाळ कुटुंबासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता जागा खरेदीसाठी किंवा ३० वर्षाच्या भाडे करारावर जमीन भाड्याने घेण्यासाठी अनुदानस्वरुपात एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य

Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Anudaan Arj

टीप :-
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ जिल्ह्यात राबवली जाणार आहे .
2. उक्त मागास प्रवर्गातील ज्या मेंढपाळ कुटूंबाच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची शेतजमीन नाही, अशा भूमीहीन मेंढपाळ कुटूंबातील कोणत्याही एका सदस्यास (पुरुष किंवा स्त्री) या योजनेंतर्गत लाभ देण्यात यावा.

Eligibility Criteria For Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Anudaan Arj

• लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-
१. सदर योजना राज्य शासनाने वेळोवेळी अधिसुचित केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीमधील ज्या मेंढपाळ कुटुंबांच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची शेतजमिन नाही अशा भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास (पुरूष किंवा स्त्री) या योजनेचा लाभ घेता येईल.
२. लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
३. लाभधारकांची निवड करताना, महिलांकरिता ३०% व दिव्यांगाकरिता ३% आरक्षण देण्यात यावे.
४. लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे.
५. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतींनिधी नसावा.
६. यापूर्वी पशूपालन संबंधीत योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

Objective Of mahamesh Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Yojana

• योजनेचा उद्देश :-
१. राज्यातील भटकंती करणाऱ्या धनगर व तत्सम समाजातील पशुपालकांना पारंपारिक पद्धतीने करित असलेल्या मेंढी/ शेळी पालन या व्यवसायापासून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व त्याद्वारे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करणे.
२. राज्यामध्ये बंदिस्त शेळी/मेंढी पालन व्यवसायास चालना देणे.
३. मेंढीपालन व्यवसायामध्ये अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त मेंढीपालन ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे.
४. मेंढीपालनाचा पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
५. राज्यामधील शेळयांच्या संख्येमध्ये वाढ करून राज्याच्या कृषी व संलग्न क्षेत्रातील स्थुल उत्पन्न वाढीच्या दराचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करणे.
६. स्थायी स्वरूपाच्या ठाणबंद पद्धतीने मेंढीपालन करण्यासाठी पशुपालकांना आकर्षित करून त्यांना स्थैर्य निर्माण करून देणे.
७. राज्यातील मेंढयांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबविणे किंबहुना त्यामध्ये वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
८. राज्यातील मेंढीपालन व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे.

Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Yojana

• योजनेचे स्वरूप :-
१. सदर योजना राज्य शासनाने वेळोवेळी अधिसुचित केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीमधील ज्या मेंढपाळ कुटुंबांच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची शेतजमिन नाही अशा भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास (पुरूष किंवा स्त्री) या योजनेचा लाभ देय असेल.
२. या योजनेमध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून भुमिहीन मेंढपाळ कुंटुंबासाठी अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता किमान १ गुंठा जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या ७५% अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाडयापोटी द्यावयाच्या रक्कमेच्या ७५% रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणुन कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान वाटप करणे.
३. सदर योजनेमध्ये ७५% हिस्सा राज्य शासनाचा व २५% हिस्याची रक्कम लाभार्थ्यांने उभारणे आवश्यक आहे.
४. २० मेंढया/शेळया व १ मेंढानर/बोकड एवढे पशुधन संगोपन करण्याकरिता सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे जागेची आवश्यकता असते.
  • २० + १ मेंढी / शेळी गटासाठी शेड बांधकाम
I. २१ प्रौढ मेंढया/शेळयांसाठी १० चौ. फुट प्रमाणे २१० चौ. फुट
II. २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फुट प्रमाणे १०० चौ. फुट
एकुण बांधकाम ३१० चौ. फुट
  • मोकळया जागेस कुंपण उभारणी
I. २१ प्रौढ मेंढया/शेळयांसाठी २० चौ. फुट प्रमाणे ४२० चौ. फुट
II. २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फुट प्रमाणे १०० चौ. फुट
एकुण ५२० चौ. फुट क्षेत्रास कुंपण
५. २० मेंढया / शेळया व १ मेंढानर / बोकड एवढे पशुधन संगोपन करण्याकरिता एकुण शेड बांधकामाकरिता ३१० चौ. फुट व ५२० चौ. फुट क्षेत्रास कुंपण असे एकुण ८३० चौ. फुट जागेची तसेच चाऱ्याची साठवणुक करण्याकरिता लागणारी जागा विचारात घेऊन साधारणपणे १००० चौ. फुट म्हणजेच १ गुंठा जागा पुरेशी आहे.

Details Of mahamesh Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Yojana

भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता किमान १ गुंठा जागा खरेदी करण्यासाठी किंवा ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी रु. ५०.०००/- च्या मर्यादेत ७५ % अनुदान देणे
अ.क्र.
तपशील
लाभार्थी संख्या
एकूण निधी (रु.)
1
राज्यस्तरीय योजनेंतर्गत भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता किमान १ गुंठा जागा खरेदी करण्यासाठी, जागेच्या किंमतीच्या ७५% अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या ७५% रक्कम एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान वाटप करणे
१६६६
८.३३ कोटी

Documents Required For mahamesh Sheli Mendhi Palan Jaga Kharedi Yojana

प्राथमिक निवड झाल्यानंतर सादर करावयाचे कागदपत्रे –
१) अर्जदार स्वत:च्या तसेच त्याच्या कुटुंबाच्या इतर सदस्याच्या नावाने जमीन नसल्याबाबत सक्षम प्राधीकाऱ्याचे प्रमाणपत्र (भूमिहीन प्रमाणपत्र)
२) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचा)
३) आधार कार्ड
४) रेशन कार्ड
५) बँक पासबुक
६) मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्र नमुना क्र. १ नुसार)
७) अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. २ नुसार)
८) स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. ५)
९) दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.